मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Love Story : सोलापूरच्या आयुक्तांनी पहिल्याच भेटीत केला होता प्रेमाचा ठराव मंजूर, पाहा कशी आहे IAS-IPS लव्हस्टोरी, Video

Love Story : सोलापूरच्या आयुक्तांनी पहिल्याच भेटीत केला होता प्रेमाचा ठराव मंजूर, पाहा कशी आहे IAS-IPS लव्हस्टोरी, Video

X
शितल

शितल तेली उगले आणि डॉ. बसवराज तेली

सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांची लव्हस्टोरी हटके आहे. त्यांनी पहिल्याच भेटीत प्रेमाचा ठराव मंजूर केला होता.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

    अनुराग सुतकर, प्रतिनिधी

    सोलापूर 12 मार्च : सरकारी अधिकाऱ्यांमधील प्रेमविवाह संपूर्ण देशात अनेकदा गाजले आहेत. केंद्रीय लोकसेवा आयोगाची खडतर परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरूवात केल्यानंतर या अधिकाऱ्यांची मनं एकमेकांशी जुळतात. यामध्ये अनेकदा जात, प्रांत, धर्म या भिंती गळून पडतात. य़ूपीएससी परीक्षेत  देशात पहिली आलेली टीना दाबी हे याचं प्रसिद्ध उदाहरण आहे. त्याचबरोबर अनेक आयएएस आयपीएस अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या प्रेमात पडून लग्न केलं असून त्यांचा संसार सुखानं सुरू आहे. सोलापूर महापालिकेच्या आयुक्त शितल तेली उगले यांची लव्हस्टोरी देखील अशीच हटके आहे.

    IAS-IPS लव्हस्टोरी

    शितल तेली-उगले या अहमदनगरच्या आहेत. सुरुवातीला अहमदनगर आणि नंतर पुण्यात त्यांचं शिक्षण झालं. तर त्यांचे पती आणि सांगलीचे पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली हे बेळगावचे आहेत. वेगळ्या राज्यात वाढलेल्या या दोन अधिकाऱ्यांचा प्रेम विवाह आहे. त्यांच्या लग्नाला आता जवळपास एक दशकाचा कालावधी उलटलाय. त्यांचा मुलगा आदित्य हा शालेय शिक्षण घेत आहे.

    मराठीत दिली परीक्षा, सोलापुरात येताच रचला इतिहास! कशा आहेत पालिकेच्या आयुक्त? पाहा Video

    शितल आणि डॉ. बसवराज यांची पहिली भेट ही मुंबईत झाली. या भेटीतच ते एकमेकांच्या प्रेमात पडले. प्रशासकीय भाषेत सांगायचं तर त्यांनी प्रेमाचा ठराव एकमेकांसोबत शेअर केला आणि तिथूनच त्यांची कमेटमेन्ट रिलेशनशिप सुरू झाली. भाषा आणि संस्कृतीची अनेक अडथळे असताना देखील त्यांचं परस्परांवरील प्रेम कायम होतं. या प्रेमातूनच त्यांनी लग्न केलं.

    पूनमनं करून दाखवलं, छोट्या गावातून आली अन् उपजिल्हाधिकारी झाली! Video

    आमची प्रशासकीय खाती ही वेगळी आहेत. आम्ही कधीही एकमेकांच्या कामामध्ये हस्तक्षेप करत नाही. पण, प्रत्येक परिस्थितीमध्ये एकमेकांना साथ देण्यासाठी एकत्र असतो. आमच्या लग्नाचं दशक आता आम्ही पूर्ण केलंय, असं शितल तेली-उगले यांनी सांगितलं.

    First published:

    Tags: Local18, Love story, Sangli, Solapur