मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सोलापुरातही राष्ट्रवादीला खिंडार, शरद पवारांचे खंदे सर्मथक शिंदे गटाच्या वाटेवर

सोलापुरातही राष्ट्रवादीला खिंडार, शरद पवारांचे खंदे सर्मथक शिंदे गटाच्या वाटेवर

दरम्यान याआधी सोलापुरात महेश कोठे समर्थक नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान याआधी सोलापुरात महेश कोठे समर्थक नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला आहे.

दरम्यान याआधी सोलापुरात महेश कोठे समर्थक नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर, 25 ऑक्टोबर : राज्यात महाविकास आघाडीचे सरकार कोसळल्यानंतर शिंदे गट आणि भाजपने सत्ता स्थापन केली. यानंतर शिवेसेनेच्या 40 पेक्षा जास्त आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा देत वेगळा गट स्थापन केला. यानंतर अनेकांचा ओढा या शिंदे गटाकडे जाण्याचा दिसत आहे.

सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जुन्या फळीतील नेते आणि शरद पवार यांचे खंदे समर्थक म्हणून ओळख असलेले सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे यांनीसुद्धा शिंदे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. काही दिवसांपूर्वीच दिलीप कोल्हे यांनी शिंदे गटातील मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली होती. तेव्हापासूनच दिलीप कोल्हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा होती.

हेही वाचा - NCP Kolhapur : हसन मुश्रीफांची मनधरणी वाया, राष्ट्रवादीचा नेता शिंदे गटात होणार सामील!

ही माहिती आता खरी ठरली आहे. कारण दिवाळीनंतर आपण 25 जणांना सोबत घेऊन शिंदे गटा प्रवेश करणार असल्याची माहिती दिलीप कोल्हे यांनी दिली आहे. दरम्यान, दिलीप कोल्हे यांच्या शिंदे गटामध्ये जाण्याच्या निर्णयाने सोलापूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे खिंडार पडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दरम्यान याआधी सोलापुरात महेश कोठे समर्थक नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे गटात प्रवेश केला आहे.

काय म्हणाले दिलीप कोल्हे -

सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आपली फरफट होत आहे. जुन्या पदाधिकाऱ्यांना डावलले जात आहे. अशीच परिस्थिती राहिली तर भविष्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाहीसा होईल, असे दिलीप कोल्हे म्हणाले आहेत. तर शेखर माने यांनी दिलीप कोल्हे यांना फोन केला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबवण्याचा प्रयत्नही केला होता. मात्र, ते त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले. यावेळी 'मी का जातोय, याचे तुम्ही व शहराध्यक्ष जाधव आत्मचिंतन करा, मग माझ्याशी बोला,' असे दिलीप कोल्हे त्यांना म्हणाले होते.

First published:

Tags: Cm eknath shinde, NCP, Sharad Pawar, Solapur