पंढरपूर, 2 नोव्हेंबर : सोलापूर जिल्ह्यातून मोठी बातमी समोर आली आहे. पंढरपुरातील राष्ट्रवादी काँग्रेसचा बडा नेता अडचणीत आल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कल्याण काळे यांनी पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सीताराम साखर कारखान्याच्या शेअर्स पोटी 41 कोटी रुपये गोळा केले होते. हे गोळा केलेले 41 कोटी रुपये परत ठेवीदारांना देण्याचे आदेश सेबीने दिले आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते कल्याण काळे यांनी पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील सीताराम साखर कारखान्याच्या शेअर्स पोटी 41 कोटी रुपये गोळा केले होते. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी सेबीकडे तक्रार केली होती. यानंतर 5 जानेवारीपर्यंत 15 टक्के वार्षिक व्याजप्रमाने रक्कम परत देण्याचे आदेश सेबीने दिले आहेत. तसेच सदर रक्कम न दिल्यास काळे यांच्यासह तत्कालीन 12 संचालक यांच्या संपतीवर टाच येणार आहे. राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांच्या तक्रारीनंतर कल्याण काळे व त्यांच्या कुटुंबीयांना सेबीचा दणका दिला आहे.
वाचा - ते काय स्वातंत्र्य लढ्यात तुरुंगात जाऊन आलेत का, संजय राऊंतांवर शिंदे गटाच्या मंत्र्यांचा प्रहार
Mahaparinirvan Din : सोलापूरातील भीम भक्तांसाठी मध्य रेल्वेकडून विशेष व्यवस्था
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर रोजी असतो. या दिनानिमित्त बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी राज्य आणि देशभरातून अनेक भाविक मुंबईत येत असतात. यासाठी भाविकांचे कोणतेही हाल होऊ नये यासाठी रेल्वे प्रशासनाने नियोजन केले आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त मध्य रेल्वे कडून 14 विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. या सर्व 14 रेल्वे गाड्या देशभरातील 16 विभागाकडून 5 डिसेंबर रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत. यामध्ये सोलापूरमधून 2 गाड्या असतील अशी माहिती सोलापूर वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक एल. के. रणयेवले यांनी दिली आहे.
सोलापूर शहरासोबतच मंगळवेढा,बार्शी ,अक्कलकोट ,पंढरपूर ,मोहोळ ,माढा या तालुक्यातून भाविक मोठ्या संख्येने सोलापूर रेल्वे स्थानकावरून महापरिनिर्वाण दिनानिमीत्त मुंबईला जातात. दरवर्षी रात्री साडेदहा वाजता निघणारी सोलापूर मुंबई सिद्धेश्वर सुपरफास्ट एक्सप्रेस या रेल्वे गाडीचे कोचेस वाढवून भाविकांची जाण्याची सोय होती. पण भाविकांची गर्दी लक्षात घेता यंदाच्या वर्षी सोलापुरातील कलबुर्गी विभागातून एका विशेष गाडीची सोय केली असल्याने भाविकांची गर्दी कमी होणार आहे. त्यामुळे यावर्षी सोलापूर मधून 2 गाड्या धावणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.