प्रीतम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर, 18 डिसेंबर : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहेत. त्यात आता सोलापूर जिल्ह्यातन एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सोलापुरात टोल कर्मचाऱ्याने टोलसाठी गाडी अडवली याचा राग मनात धरून सरपंचाकडून कोयत्याने हल्ला करण्यात आला, असा आरोप कर्मचाऱ्याने केला आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण -
टोल नाक्यावरील मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. टोल कर्मचारी अझरुद्दीन फुलारी याने हा आरोप केला आहे. तर बेगमपूरचे सरपंच अस्लम चौधरी यांनी मारहाण केल्याचा आरोपी टोल कर्मचाऱ्याने केला आहे. सोलापूर-सांगली राष्ट्रीय महामार्गावरील इचगाव टोलनाक्यावर हा प्रकार घडला आहे. ही मारहाणीची घटना शनिवार 17 डिसेंबर रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी कामती पोलीस स्टेशन येथे या टोल कर्मचाऱ्याने फिर्याद दिली आहे. यानंतर पोलीसांमार्फत मारहाण करणाऱ्याचा तपास सुरु आहे. तसेच याप्रकरणी बेगमपूरचे सरपंच अस्लम चौधरी यांच्यासह 15 ते 20 लोकांचा तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा - 'फोन केला तर ती फक्त रडत होती', 8 मित्रांचे सैतानी कृत्य
सोलापूरकरांना मिळाली नववर्षाची भेट -
येत्या नवीन वर्षात म्हणजेच जानेवारी 2023 पासून सोलापूरकरांना एक दिवस आगोदर पाणी मिळणार आहे. ज्या भागामध्ये चार दिवसाआड पाणीपुरवठा होतो तिथे तीन दिवसाआड तर ज्या भागामध्ये तीन दिवसाआड पाणी पुरवठा होतो. त्या भागामध्ये दोन दिवस आड पाणीपुरवठा केला जाणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शितल उगले तेली यांनी दिली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Crime news, Solapur