मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : आमदार शहाजी पाटलांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर..

Video : आमदार शहाजी पाटलांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात; एकाचा जागीच मृत्यू तर..

आमदार शहाजी पाटलांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

आमदार शहाजी पाटलांच्या ताफ्यातील गाडीचा अपघात

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलीस गाडीला अपघात झाला असून एकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सांगोला, 9 फेब्रुवारी : ‘काय झाडी, काय डोंगार, काय हॉटेल, ओकेमध्ये आहे’ या संवादामुळे प्रसिद्ध झालेले शिंदे गटाचे सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात झाला. शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिस गाडीला हा अपघात झाला आहे. सांगोला तालुक्यातील नाजरा गावाजवळ आज दुपारी ही घटना घडली. अपघातामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे तर एक जण गंभीर जखमी आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.

काय आहे घटना?

सांगोला तालुक्यातील नाजरा येथे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित शिबिरासाठी गेले होते. शिबिराचा कार्यक्रम संपल्यानंतर ते सांगोला शहराकडे येत असताना त्यांच्या वाहनाच्या पुढे पोलीस  गाडीचा ताफा  होता. त्यातील एका गाडीचा आणि मोटार सायकलीचा अपघात झाला.  या अपघातात एक जण जागीच ठार झाला तर एकाची प्रकृती चिंताजनक आहे. सांगोला पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद झाली करण्यात आली आहे.

वाचा - चिंचवड पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीच्या प्रचारात ठाकरेंची शिवसेना गायब; पक्षात दोन गट?

कशी घडली घटना?

सांगोला तालुक्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गाड्यांचा ताफा नाझरे गावामधून सांगोल्याकडे जात असताना नाझरे गावच्या जिल्हा मार्गावरील अंतर्गत रोडवर आमदार शहाजी पाटील यांच्या ताफ्यामधील सरकारी पोलीस स्कार्पिओ गाडी क्रमांक (MH 13 DM 1940) आणि मोटारसायकल क्रमांक (MH 45 AG 6330)  या दोन्ही गाड्यांचा समोरासमोर अपघात झाला.

या अपघातात मोटारसायकलस्वार अशोक नाना वाघमारे (वय 50, रा. माडगूळे. ता. आटपाडी, जि. सांगली) हे जागीच ठार झाले तर त्यांच्या पाठीमागे बसलेले नाना अमूने हे (रा. एकतपुर, ता. सांगोला)  गंभीर जखमी झाले. अपघाताचे वृत्त समजताच महामार्गाच्या पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमीला सांगोला येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी तातडीने दाखल केले.

First published:

Tags: Accident, Solapur