विरेंद्रसिंह उटपट, प्रतिनिधी
पंढरपूर, 16 जानेवारी : ज्येष्ठ किर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. अशा अवस्थेतही त्यांनी एक संकल्प पूर्ण केला आहे. त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथांच्या चरणी सुमारे पाच लाख रुपये किंमतीचे आठ तोळे वजनाचे सोन्याचे दागिणे अर्पण केले आहेत.
नातेपुते येथील त्यांचे भक्त व बातमीदार सुनिल राऊत यांच्या हस्ते पंढरपूर येथील बापूसाहेब महाराज देहूकर यांच्याकडे सोन्याचे दागिने मकरसंक्रांतीच्या दिवशी निवृत्तीनाथांच्या चरणी अर्पण करण्यासाठी सुपूर्त केले. बापूसाहेब महाराज देहूकर हे दागिने निवृत्तीनाथ महाराज संस्थानकडे देण्यासाठी त्र्यंबकेश्वरकडे रवाना झाले आहेत. बंडातात्या कराडकर हे गेल्या अनेक वर्षापासून किर्तन, प्रवचन आणि भजनाच्या माध्यमातून निस्पृहपणे समाज सुधारणेचे काम करत आहेत. आध्यात्माबरोबर व्यसनमुक्त समाजासाठीही त्यांनी मोठे काम केले आहे. अजून त्यांचे काम सुरुच आहे.
वाचा - नागा आणि अघोरी साधू एकच नसून पूर्णपणे भिन्न; उपासना वाचून काळजात भरेल धडकी
बंडातात्या गावोगावी जावून किर्तन, प्रवचन करतात. त्यातून मिळालेले मानधान त्यांनी स्वतःसाठी खर्च न करता समाजासाठी खर्च केले आहे. आतापर्यंत त्यांनी दुर्लक्षीत देवस्थांना मदत केली आहे. अलीकडेच त्यांनी त्र्यंबकेश्वर येथील निवृत्तीनाथ महाराज मंदिरातील विठ्ठल रुक्मिणीला सोन्याचे दागिने अर्पण करण्याचा संकल्प केला होता. त्यासाठी त्यांनी नातेपुते येथील सकाळचे बातमीदार सुनिल राऊत यांच्याशी चर्चा करुन सोन्याचे दागिने तयार करुन घेण्यास सांगितले होते. त्यानुसार राऊत यांनी सोन्याचे दागिने तयार करुन घेतले. दरम्यान बंडातात्या कराडकर यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांना भेटण्यासाठी पंढरपूरचे बापूसाहेब महाराज देहूकर काल गेले होते. त्यावेळी बंडातात्या यांनी एक चिठ्ठी लिहून निवृत्तीनाथ महाराज देवस्थानसाठी तयार केलेले सोन्याचे दागिणे आहेत. ते तुम्ही त्र्यंबकेश्वरला मंदिर देवस्थानाकडे सुर्फूत करा असे सांगितले. त्यानुसार आज देहूकर यांच्याकडे सोन्याचे दागिने देण्यात आले. रुग्णालयात असूनही समाजाविषयी व देवस्थानाविषयी असलेली त्यांची तळमळ पाहून अनेक वारकऱ्यांनी त्यांच्या प्रकृत्तीमध्ये सुधारणा व्हावी असे विठ्ठलाला साकडे घातले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Solapur