सोलापूर, 20 डिसेंबर : राज्यात 34 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. 34 जिल्ह्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. आज या निवडणुकीचा निकाल आता समोर येत आहे.
पंढरपूर तालुक्यातील आजोती ग्रामपंचायत सरपंच पदासह सर्व गट राष्ट्रवादीचा निवडून येण्यासाठी अमरजीत पवार हे आग्रही होते. त्यानुसार आरती अभिजित पवार हे विजयी झाले. या विजयानंतर अमरजित पवार यांच्या केसाची व दाढीची चर्चा रंगली. गेल्या तीन वर्षापासून सरपंच पद राष्ट्रवादीचा झाल्याशिवाय आपण केस आणि दाढी काढणार नाही. असा पण, पवार यांनी केला होता.
आणि आज अमरजीत पवार यांच्या राष्ट्रवादी गटाचा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जनतेमधून सरपंच झाल्यावर त्यांनी हा आपला पण, तिरुपती बालाजी येथे जाऊन पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी त्यांनी मतदारांचे आभार मानत पुष्पा स्टाईलने आपल्या केसावरून आणि दाढीवरून हात फिरवत मतदारांना अभिवादन करत आभार मानले.
हेही वाचा - Maha Gram Panchayat Election : रत्नागिरीच्या गुहाघरमध्ये शिवसेनेचं वर्चस्व, गड राखला
कोल्हापूरच्या कागलमध्ये राष्ट्रवादी-भाजपमध्ये कांटे की टक्कर -
कोल्हापुरच्या कागल तालुक्यातील 26 पैकी 12 सरपंच पदाचे निकाल झाले आहेत. निकाल पुढीलप्रमाणे -
राष्ट्रवादी 04,
भाजप 04 ,
शिंदे गट 02,
ठाकरे गट 02
दरम्यान, या निवडणुकीदरम्यान, मोठी बातमी समोर आली आहे. गोकुळ दूध संचालक प्रकाश पाटील यांच्या गटाचा पराभव झाला आहे. नेर्ली ग्रामपंचायत सरपंच पदाच्या निवडीत अंकुश पुजारी धनगर विजयी झाले असून गोकुळ संचालक प्रकाश पाटील यांच्या पॅनेलचा पराभव झाला आहे. प्रकाश पाटील हे आमदार सतेज पाटील यांच्या गटाचे संचालक आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Election, NCP, Pandharpur