मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /पांगरी स्फोट प्रकरणी अखेर नाना पाटेकरला अटक, तमिळनाडूमधून पोलिसांनी उचललं

पांगरी स्फोट प्रकरणी अखेर नाना पाटेकरला अटक, तमिळनाडूमधून पोलिसांनी उचललं

पांगरी फटाका स्फोटातील मुख्य आरोपी नाना पाटेकर याला सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने तमिळनाडू येथून अटक केली आहे.

पांगरी फटाका स्फोटातील मुख्य आरोपी नाना पाटेकर याला सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने तमिळनाडू येथून अटक केली आहे.

पांगरी फटाका स्फोटातील मुख्य आरोपी नाना पाटेकर याला सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने तमिळनाडू येथून अटक केली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur [Sholapur], India

सोलापूर, 5 फेब्रुवारी, प्रितम पंडित:  पांगरी फटाका स्फोटातील मुख्य आरोपी नाना पाटेकर याला सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने तमिळनाडू येथून अटक केली आहे. वर्षाच्या पहिल्याच दिवशी पांगरी येथे फटाका फॅक्टरीला भीषण आग लागली होती. या आगीत फटाका फॅक्टरीत काम करणाऱ्या पाच महिलांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. तर त्यात तीन महिला गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. या प्रकरणी फटाका फॅक्टरी मालकाविरोधात पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपीचा पोलिसांना चकवा  

फटाका फॅक्टरीला आग लागून एक महिना उलटला तरी मुख्य आरोपीला पकडण्यात पोलिसांना यश येत नव्हत. मुख्य आरोपी नाना पाटेकर हा गेल्या महिनाभरापासून पोलिसांना चकवा देत होता. अगीच्या घटनेननंतर तो फरार झाला होता. त्याच्या शोधासाठी सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेकडून पथक नियुक्त करण्यात आले होते. अखेर त्याला सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेने तमिळनाडू येथून अटक केली आहे.

हेही वाचा : 'तू जो पायला असेल त्याच्यासोबत खूश रहा', ...अन् तरुणाने स्वत:ला संपवलं; औरंगाबादमधील धक्कादायक प्रकार

तमिळनाडूमधून अटक  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की नाना पाटेकर हा तमिळनाडूला पळून गेल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली होती. खबऱ्याने दिलेली माहिती आणि तांत्रिक बाबींच्या तापासाच्या आधारे सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक तामिळनाडूला रवाना झाले. नाना पाटेकर हा राज्यातील कोईम्बतुर, मदुराई, शिवकाशी या जिल्ह्यात वास्तव्याला असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली होती. पोलीस तांत्रिक बांबीचा अभ्यास करत आरोपीपर्यंत पोहोचले, अखेर नाना पाटेकर याला अटक करण्यात आली आहे.  त्याला बार्शी येथील न्यायालयासमोर हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

First published:

Tags: Police, Solapur, Solapur news