मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /स्पेशल मलईनं मिळेल उन्हाळ्यात गारवा, नाझ मस्तानी एकदा घेऊन तर पाहा, Video

स्पेशल मलईनं मिळेल उन्हाळ्यात गारवा, नाझ मस्तानी एकदा घेऊन तर पाहा, Video

X
Solapur

Solapur News : या ठिकाणची नाझची मस्तानी प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथं ग्राहकांची नेहमी गर्दी असते.

Solapur News : या ठिकाणची नाझची मस्तानी प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथं ग्राहकांची नेहमी गर्दी असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

    अनुराग सुतकर, प्रतिनिधी

    सोलापूर, 29 मार्च : उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. यातच शहरात थंड पेयाचे स्टॉल दिसून येत आहेत. थंड पेयाच्या स्टॉलवर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये ज्यूससोबतच, कोल्ड्रिंक, ताक, लस्सी, मठ्ठा थंड पेय पिण्यासाठी मोठी गर्दी होत असते. सोलापूरमध्ये थंड पेयाचा एक अनोखा स्टॉल असून या ठिकाणची नाझची मस्तानी प्रसिद्ध आहे. त्यामुळे इथं ग्राहकांची नेहमी गर्दी असते.

    कोणती मिळते मस्तानी?

    1985 साली सलमान शेख यांच्या वडलांनी या स्टॉलची सुरुवात सोलापूर शहरामध्ये केली होती. सध्या सलमान शेख हे स्टॉल सांभाळतात. शहरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या कोपऱ्यावर त्यांचा स्टॉल आहे. मस्तानीला लागणारी स्पेशल मलई स्वतः सलमान शेख याचे वडील घरी बनवतात. साधारणपणे पाच प्रकारच्या मस्तानी येथे मिळतात. यामध्ये चॉकलेट, रोझ, एप्पल, मंगो आणि बटरचा समावेश आहे. दररोज जवळपास 400 ते 500 ग्लास मस्तानी या त्यांच्या विकल्या जातात.

    कशी बनते मस्तानी?

    मस्तानीमध्ये साधारणपणे दुध, ग्राहकांच्या मागणीनुसार बर्फ, स्वःतच तयार केलेली स्पेशल मलई आणी पाहिजे त्या फ्लेवरचा इसेन्स योग्य प्रमाणात टाकून तो मिक्स केला जातो. याप्रकारे मस्तानी तयार होते. या मस्तानीची किंमत 30 रुपयांपर्यंत आहे. 

    मस्तानी बनवण्याचे सर्व सामग्री आमचे वडील घरीच तयार करतात आणि आम्ही फक्त येथे व्यवस्थित प्रमाण एकत्रित करून ही मस्तानी ग्राहकांना देत असतो. अजूनही हरीभाई देवकरण प्रशालेचे अनेक आजी-माजी विद्यार्थी आम्हाला आमची गाडी किती जुनी आहे याची आठवण करून देतात. तसेच आमच्या मस्तानीची चव चांगली आहे सांगतात, असं सलमान शेख यांनी सांगितले. 

    गूगल मॅपवरून साभार

    कुठे मिळेल मस्तानी?

     शहरातील हरीभाई देवकरण प्रशालेच्या कोपऱ्यावर त्यांचा स्टॉल आहे.

     

    First published:
    top videos

      Tags: Local18, Local18 Food, Solapur, Summer season