मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

संविधान दिनानिमीत्त सोलापुरात सजीव देखावा सादर, पाहा video

संविधान दिनानिमीत्त सोलापुरात सजीव देखावा सादर, पाहा video

X
शहरातील

शहरातील जीएम मागासवर्गीय संस्थेच्या वतीने संविधान दिनानिमीत्त सजीव देखावा सादर करण्यात आला.

शहरातील जीएम मागासवर्गीय संस्थेच्या वतीने संविधान दिनानिमीत्त सजीव देखावा सादर करण्यात आला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur [Sholapur], India

सोलापूर, 26 नोव्हेंबर : 1949 मध्ये संविधान सभेने भारतीय राज्यघटना स्विकारल्याचा दिवस म्हणून भारत दरवर्षी 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिन किंवा राष्ट्रीय कायदा दिवस साजरा करतो. याच भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधत सोलापूर शहरात विविध ठिकाणी संविधानाच्या सन्मानार्थ विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये शहरातील जीएम मागासवर्गीय संस्थेच्या वतीने सजीव देखावा सादर करण्यात आला.

यामध्ये संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हाती संविधान सुपूर्द करतानाचा सजीव देखावा दाखवण्यात आला. यामध्ये संविधान सुपूर्द करतेवेळी असणाऱ्या सर्व मान्यवरांच्या वेशभूषेतील पेहराव परिधान करून हा देखावा पार पडला. शहरात पहिल्यांदाच अशा स्वरूपाचा जिवंत देखावा सादर करण्यात आला.

10 वर्षांची कायदे पंडित! संविधानाची तोंड पाठ कलमे ऐकून बसणार नाही विश्वास, video

सर्व भारतीयांच्या मनात भारतीय संविधान दिनाचा जागर झाला पाहिजे या हेतूने या शोभायात्रेचे आयोजन करण्यात होते. तसेच संस्थेच्या वतीने त्रिसूत्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सजीव देखावा सादर करण्यात आला, असं कार्यक्रमाचे आयोजक पप्पू गायकवाड यांनी सांगितले. 

यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका विश्वजीत सरवदे ,डॉ. राजेंद्र प्रसाद यांची भूमिका अशोक किल्लेदारपंडित जवाहरलाल नेहरू यांची भूमिका संतोष साळुंखे, सरदार वल्लभभाई पटेल यांची भूमिका संजय अपराध, डॉ. मौलाना आझाद यांची भूमिका तनवीर विजापुरे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्विय सहाय्यक यांच्या भूमिकेत आशितोष नाटकर यांनी वेशभूषा परिधान केली होती.

या संविधान सन्मानार्थ शोभायात्रेची सुरूवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थिविहार प्रेरणा भूमी इथून छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान येथे सांगता करण्यात आली. या संविधान सन्मानार्थ शोभायात्रेतील सजीव देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

 

First published:

Tags: Local18, Solapur