मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Solapur : शेतकऱ्यांची फसवणूक भोवली, 'त्या' कृषी केंद्रांवर कारवाईची कुऱ्हाड

Solapur : शेतकऱ्यांची फसवणूक भोवली, 'त्या' कृषी केंद्रांवर कारवाईची कुऱ्हाड

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्रांना दणका बसला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्रांना दणका बसला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या कृषी केंद्रांना दणका बसला आहे.

  • Local18
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर 24 नोव्हेंबर : शेतकऱ्यांना पीकाचे उत्पादन करताना वेगवेगळ्या अडचणींचा सामना करावा लागतो. लहरी हवामान, पावसाचे बदललेलं वेळापत्रक, बाजारपेठेतील किंमतीचा चढ-उतार, सरकारी धोरणं अशा अनेक अडथळे पूर्ण केल्यानंतरच त्यांना उत्पादन मिळते. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदा आणखी एक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांना फसवणूक सहन करावी लागली. कृषी केंद्रांकडूनच ही फसवणूक झाली आहे. या प्रकरणात कृषी विभागानं केंद्रावर कडक कारवाई केली आहे.

काय आहे प्रकरण?

पंढरपूर तालुक्यातल्या करकंब आणि बार्डी गावातल्या आठ द्राक्ष बागायतदारांनी कृषी केंद्रातील तणनाशक आपल्या बागेत फवारले होते. पण, छाटणीनंतर त्यांची बाग फुललीच नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. या प्रकरणात शेतकऱ्यांनी पंढरपूर तालुका कृषी अधिकाऱ्यांकडं तक्रार केली होती.

बाग छाटणीच्या दहा ते पंधरा दिवसआधी या शेतकऱ्यांनी ओंकार कृषी केंद्रातून तणनाशक घेऊन बागेत फवारले.  त्यांची बाग छाटणीनंतर फुललीच नाही. या प्रकरणात केलेल्या चौकशीनंतर  मॉडर्नॲग्री जेनेटिक लिमिटेड या कंपनीने महाराष्ट्रात कोणतेही तणनाशके विक्रीचा परवाना घेतला नाही असे निदर्शनास आले.

Video : स्टोन क्रशरमुळे द्राक्ष बागेवर कुऱ्हाड, अधिकाऱ्यासमोर शेतकरी ढसाढसा रडला

जिल्हा कृषी विभागानं या प्रकरणाची गंभीर दखल घेत विठ्ठल कृषी केंद्र आष्टी ता. मोहोळ, महावीर ट्रेडिंग कंपनी माळशिरस ता. माळशिरस, कलाशंकर कृषी केंद्र नातेपुते ता. माळशिरस आणि  ओंकार कृषी केंद्र करकंब ता.पंढरपूर या केंद्रांवर कारवाई करण्यात आले आहे.

Video : बहरलेल्या द्राक्ष बागेची बोली लागली, भावही ठरला! पण रात्रीत…

आम्ही प्रत्यक्षात जाऊन तिथे नुकसानीची पाहणी केली आहे. पिकांचे नुकसान हे या फवारणीमुळेच झाले असल्याचे प्राथमिक अहवालात आम्हाला समजले. त्यानुसार आम्ही या कृषी केंद्रांचे परवाने रद्द केले आहेत. असे अवैध स्वरूपातील कीटकनाशके कोणीही विकू नये नाहीतर कारवाई अटळ आहे, अशी माहिती सोलापूर जिल्हा कृषी अधिक्षक बाळासाहेब शिंदे यांनी दिली आहे.

First published:

Tags: Agriculture, Local18, Solapur