मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

19 दिवसांवर लेकाचं लग्न; लातूरच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारींच्या पत्नीने का संपवलं जीवन?

19 दिवसांवर लेकाचं लग्न; लातूरच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारींच्या पत्नीने का संपवलं जीवन?

स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे 18 डिसेंबरला लग्न रोजी होते.

स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे 18 डिसेंबरला लग्न रोजी होते.

स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे 18 डिसेंबरला लग्न रोजी होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India
  • Published by:  Khushalkant Dusane

सोलापूर, 28 नोव्हेंबर : राज्यात दिवसेंदिवस हत्या आणि आत्महत्येच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच आता आणखी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. लातूर येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या पत्नीने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली. स्नेहलता प्रभू जाधव (वय 45, रा. लातूर) असे त्यांचे नाव आहे. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

लातूर येथील अतिरिक्त मुख्य कार्यकारी प्रभू जाधव यांच्या पत्नीने आत्महत्या केली. ही घटना रविवारी घडली. हॉटेलच्या रूममध्ये त्यांनी गळफास घेत आपले जीवन संपवले. स्नेहलता प्रभू जाधव यांनी आत्महत्येपूर्वी नातेवाईकाला फोन करून आपण आत्महत्या करणार असल्याचे सांगितले होते.

स्नेहलता प्रभू जाधव यांच्या मुलाचे 18 डिसेंबरला लग्न रोजी होते. त्यामुळे लग्नाच्या खरेदीसाठी त्या, त्यांचे पती आणि नातेवाईक कर्नाटकातील चडचण येथे गेले होते. दरम्यान, शनिवारी रात्री उशीर झाल्याने ते सोरेगाव रोडवरील एका हॉटेलमध्ये मुक्कामी थांबल्या. यानंतर रविवारी सकाळी प्रभू जाधव हे कामानिमित्त लातूरला निघून गेले. मात्र, दुपारच्या सुमारास स्नेहलता यांनी आपल्या लातूरमधील नातेवाईकाला फोन केला.

यावेळी त्या जोरजोराने रडत होत्या आणि आपण 'आत्महत्या करणार' असे सांगू लागल्या. यामुळे नातेवाईकांनी त्यांना समजावून सांगितले. तसेच घटनेची माहिती सोलापुरातील नातेवाईकांना दिली. यानंतर लगेचच दहा ते पंधरा मिनिटांनी सोलापुरातील नातेवाईक हॉटेलवर गेल्यानंतर हॉटेलचा दरवाजा बंद आढळला. यामुळे नातेवाईकांनी दरवाजा तोडून हॉटेलमध्ये प्रवेश केला. मात्र, तोपर्यंत उशिर झाला होता. आणि यावेळी स्नेहलता प्रभू जाधव या साडीच्या साह्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळल्या.

हेही वाचा - ...म्हणे प्रेमात अडसर, प्रियकराच्या मदतीने मामाच्याच मुलीचा केला गेम; बीड हादरलं!

नातेवाईकांनी त्यांना लगेचच उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. यानंतर रात्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले आणि त्यानंतर त्यांचा मृतदेह हा नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. दरम्यान, रात्री विजापूर नाक्याचे विलास घुगे, विशाल जाधव आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या प्रकरणाचा अधिक तपास विलास घुगे करत आहेत.

First published: