प्रीतम पंडित, सोलापूर, 24 मार्च : सोलापूर शहरातील पाण्याचा प्रश्न विधिमंडळात चांगलाच गाजला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी म्हटलं की, सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बंधाऱ्यातून कर्नाटक पाणी उपसत आहे. उजनी ते सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम बिघडले आहे. त्यावर राज्य सरकारकडून पुढील आठवड्यात बैठक घेतली जाईल असे उत्तर दिले आहे.
सोलापूर महानगरपालिकेकडून पाण्याचे योग्य नियोजन होत नसल्यामुळे शहराला सहा ते आठ दिवसाआड पाणी मिळत असल्याचा प्रश्न आमदार प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला आहे. कर्नाटक राज्य सोलापूरकरांच्या हिश्याचे पाणी उचलते हे खरे आहे. सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून पाणी उपसा केला जातो मात्र या पाण्याच्या उपसाचे नियोजन नाही त्यामुळे सोलापूर शहराला सहा दिवसात पाणीपुरवठा होत असल्याचे आमदार प्रणिती शिंदे यांनी सांगितले.
हिरेंवर ठाकरे गटाकडून मोठी जबाबदारी? उद्धव ठाकरेंच्या मालेगावच्या सभेचा टीझर जारी
सोलापूर शहरात सध्या काही भागात चार दिवसात पाणी येते तर काही भागात पंधरा दिवसांनी पाणी दिले जाते. सोलापूर जिल्ह्याला लागून असणाऱ्या कर्नाटक सीमेवरती सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणारे तीन बंधारे आहेत. या बंधाऱ्यात उजनी धरणातून पाणी सोडले जाते. औज, चिंचपूर, कर्नाटकातील धुळखेड बंधाऱ्यातून पाणी उपसा करण्यासाठी कर्नाटक सरकारने 570 एचपीचे तीन नवीन पंप टाकून पाणी उपसा केला जात असल्याचे मत माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Solapur