मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /उन्हाळ्यात तुमची तहान भागवणारा थंड पाण्याचा माठ कसा बनतो? पाहा Video

उन्हाळ्यात तुमची तहान भागवणारा थंड पाण्याचा माठ कसा बनतो? पाहा Video

X
Solapur

Solapur News : उन्हाळ्यात तुमची तहान भागवणारे माठ किंवा रांजण कसे बनतात हे तुम्हाला माहिती आहे का?

Solapur News : उन्हाळ्यात तुमची तहान भागवणारे माठ किंवा रांजण कसे बनतात हे तुम्हाला माहिती आहे का?

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Solapur, India

  अनुराग सुतकर, प्रतिनिधी

  सोलापूर, 23 मार्च :  उन्हाळ्याची दाहकता वाढली की सर्वांनाच थंड पाणी प्यावेसे वाटते. ही तहान भागवण्यासाठी फ्रिजमधील पाणी  हे शरिरासाठी हानीकारक असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे. उन्हाळ्यात माठातलं थंड पाणी प्यावं, असा त्यांचा सल्ला असतो. थंड पाणी देणारे  माठ किंवा रांजण कसे बनतात हे तुम्हाला माहिती आहे का?  सोलापूर जिल्ह्यातील होटगी गावामध्ये 100 पेक्षा जास्त कुंभार आजही पारंपरिक पद्धतीनं याची निर्मिती करतात.

  कशी होते निर्मिती?

  माठ निर्मिती करणारे कारागीर लक्ष्मण कुंभार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'कर्नाटकातील नदी किनाऱ्यावर साचलेली माती आणि साखर कारखाण्यातील बग्यास एकत्र केला जातो. या एकत्रित मातीला चाकावर आकार देऊन त्याचा माठ तयार केला जातो. त्यानंतर दगडाचा घोटा आणि लाकूड यांच्या आतून बाहेरून बडवण्याच्या विशेष पद्धतीनुसार मोजून मापून माठ तयार केला जातो.

  उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी काय करावं? आयुर्वेदात दिलाय महत्त्वाचा सल्ला, पाहा Video

  होटगी गावातील आठ वर्षाच्या मुलापासून ते सत्तर वर्षांच्या वयोवृत्तांपर्यंत सर्वच जण अगदी कौशल्यपूर्वक फिरत्या चाकावर मातीला आकार देत माठ बनवतात. एक कुंभार साधारणपणे  सिझनमध्ये  300 ते 400 माठ बनवू शकतो. सोलापूर जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या अनेक गावांमध्ये हा माठ निर्यात केला जातो. माठ बनवण्याची ही पद्धत पाहता तुम्हाला फिरत्या चाकावर देशील मातीला आकार विठ्ठला तू वेडा कुंभार हे ग दि माडगूळकर यांचे भक्तीगीत नक्कीच आठवेल. खुद्द विठ्ठलाकडून शिकून आलेल्या कौशल्याप्रमाणे हे मातीला आकार देण्याचे कौशल्य असल्याचंही तुम्हाला जाणवेल.

  अस्सल सोलापुरी नॉनव्हेजसाठी 'इथं' भेट द्या, एकदा खाल तर बोटं चाखाल! Video

  किती आहे किंमत?

  'यापूर्वी अगदी कमी किंमतीला मिळणारा माठ आता 120 ते 150 रुपयांना बाजारात उपलब्ध आहे. हा संपूर्ण मानवी कौशल्याचा प्रकार आहे. त्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागते. एक व्यक्ती दिवसाला 20 रांजण तयार करु शकतो,' असे लक्ष्मण कुंभार यांनी स्पष्ट केलं.

  तीन ते चार दिवस एका बंदिस्त खोलीमध्ये हवा किंवा पाणी लागणार नाही अशा ठिकाणी ठेवले जाते. त्यानंतर भट्टीमध्ये तापवून तो अधिक ठणक केला जातो. या सर्व निर्मिती प्रक्रियेतून तावून सुलाखून निघाल्यानंतर डेरा किंवा माठ तयार होतो,' असं कुंभार यांनी सांगितलं.

  First published:
  top videos

   Tags: Local18, Solapur, Summer season