सोलापूर, 12 नोव्हेंबर : सोलापुरातील निलम नगर भागात असणाऱ्या यंत्रमाग कारखान्याला आग लागली आहे. चादर आणि टॉवेल निर्मिती करणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. या कारखान्यातील सर्व यंत्रे-मशिनरी आणि कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी गेल्याची माहिती मिळत आहे.
सोलापुरातील निलम नगर भागात असणाऱ्या यंत्रमाग कारखान्याला आग लागली. मशिनरी आणि कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी. #fire #viralvideo pic.twitter.com/8JZLbMTwWI
— News18Lokmat (@News18lokmat) November 12, 2022
सुदैवाने कारखान्यातील कामगार वेळीच बाहेर पडल्याने त्यांना कोणतीही इजा नाही. या आगीत जीवीतहानी झालेली नाही. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या पाच ते सहा गाड्य घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार सोलापुरातील नीलमनगर भागात असलेल्या एका यंत्रमाग कारखान्याला ही भीषण आग लागली आहे. संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. नीलमनगर हा सोलापुरातील औद्योगिक वसाहत असलेला हा भाग आहे. या ठिकाणी अनेक मोठे कारखाने असून, संध्याकाळच्या सुमारास अचानक येथील एका यंत्रमाग कारखान्याला भीषण आग लागली.
हे वाचा - राज ठाकरेंनी राज्याची माफी...;जामिनानंतर जितेंद्र आव्हाडाची पहिली प्रतिक्रिया
ही आग कशामुळे लागली याची माहिती समजू शकलेले नाही. कामाची वेळ संपल्यामुळे अनेक कामगार कारखान्यातून बाहेर पडले होते. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मात्र, आगीमुळे कारखान्यातील कच्चामाल आणि यंत्रे आगीत जळाली आहेत. त्यामुळे कारखान्याचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.