सोलापूर, 22 डिसेंबर : आमचे लग्न जमत नाहीय...आम्हाला कोणी मुलगी देत नाहीय... वय वाढत चाललं आहे... पस्तीशी ओलांडली तरी कोणतीही मुलगी लग्नासाठी होकार देत नाही... आम्ही काय करायचे? यासाठी जबाबदार कोण? आम्ही बेरोजगार तरुण मुलीच्या घरच्यांच्या अपेक्षा कशा पूर्ण करणार? या सर्व प्रश्नांसाठी सोलापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा काढण्यात आला.
घोड्यावर वरात, समोर बँड बाजा या लावाजम्यासह हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. भविष्यात मला बायको मिळेल का.. कुणी मुलगी देता का मुलगी !!!लग्नासाठी! बेटी बचाव बेटी पढाव...गर्भलिंग निदान चाचणीची कडक अंमलबजावणी झालीच पाहिजे... असे फलक घेऊन नवरदेवाच्या वेशात मुंडावळे , फेटा बांधून हे तरुण आपले लग्न जमत नाही म्हणून सरकारकडं साकडे घालायला आले होते.
का जमत नाही लग्न?
आई वडील शेतात मोलमजुरी करतात, त्यामुळे स्वतःचे व्यवस्थित घर उभे राहू शकले नाही. मुलीकडील पाहुणे मात्र चार-पाच एकर शेती पाहिजे आणि मुलाला स्वतःचे चांगले घर असले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करतात. ही अपेक्षा पूर्ण करणे सध्यातरी शक्य नाही, अशी भावना या मोर्चात सहभागी झालेल्या तरुणांनी व्यक्त केली.
… तिच्या जागी पोलीस आले आणि रोड रोमियोची उडाली धांदल! पाहा Video
आजपर्यंत लग्नासाठी जवळपास 20 मुली मी पाहिला. त्या सर्वांच्या अपेक्षा भरपूर आहेत. आता मला 37 वर्ष पूर्ण झाले आहेत. पण, कुणी मुलगी देत नाही. त्यामुळे मी या आंदोलनात सहभागी झालो, असे मधू माळी यांने सांगितले. 37 वर्षांच्या तरुणाप्रणाचे 25 वर्षांचा तरुणही या मोर्च्यात सहभागी झाला होता.
'माझे वय 25 आहे , मी मोहाळ वरुन आलोय , माझ्या पेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलांची मी अवस्था पाहिली. त्यांची लग्न होत नाही. यामागील अनेक कारणे आहेत. मला माझ्या भविष्याची चिंता सतावत आहे, सरकारनं आमच्यासारख्या तरुणांचा विचार करावा, म्हणून मी या मोर्च्यात सहभागी झालो, असे या मोर्चासाठी मोहळहून आलेल्या सिद्धार्थ एकमलेनं सांगितलं.
घरी जाण्यासाठी हेलिकॉप्टर हवयं, नगरच्या माजी सैनिकाचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र!
'ज्यांची शंभर-दोनशे एकर बागायत शेती आहे त्या मुलांची लग्न लगेच जमतात. जो मोलमजुरी करून जगतो त्याची लग्न का जमत नाहीत ? हा प्रश्न घेऊन आम्ही इथं आलो आहोत. सरकारनं आमच्या मागण्यांकडे लक्ष देत मुलींची संख्या कशी वाढेल यावर उपाययोजना केली पाहिजे. सध्या 1000 मुलांना मागे 840 मुली असं प्रमाण आहे. त्यामुळे जवळपास दीडशे मुलांची लग्न जमत नाहीत. राज्य सरकारनं यावर तोडगा काढावा,' अशी मागणी या मोर्चाचे आयोजक रमेश बारसकर यांनी केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.