सोलापूर, 02 डिसेंबर : सोलापूर शहरातील विविध भागातून महागड्या सायकली चोरणाऱ्या तरूणीला शहर गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक केलीली तरुणी डिप्लोमाचे शिक्षण घेत असून सध्या प्रथम वर्षात ती शिकत आहे. घरची हलाखीची परिस्थिती आणि शिक्षणासाठी पैसे नव्हते. त्यामुळे तिने मागील काही दिवसांत तब्बल 13 सायकली चोरल्याचे सांगितले आहे.
शहरातील कोणार्क नगर येथे राहणारे चंद्रकांत म्हैत्रे यांची सायकल 14 सप्टेंबर रोजी चोरी गेली होती. अक्कलकोट रोडवरील मोहन कोंडले यांची सायकल 19 ऑगस्ट रोजी चोरीस गेली होती. तसेच लिटल फ्लॉवर स्कूल मधील पार्किंग मधून, होटगी रोड आणि जुळे सोलापूर परिसरातून महागड्या सायकली चोरीला गेल्या असल्याने फिर्यादी सदर बाजार पोलीस स्टेशन आणि विजापूर नाका पोलीस स्टेशन येथे तक्रारी घेऊन आले होते. फिर्यादींनी सायकल चोरी करणारी मुलगी असल्याचे सांगितले होते. त्यानुसार पोलिसांनी तिचा शोध घेत तिला अटक केली. यावेळी तिने घरची हलाखीची परिस्थिती आणि शिक्षणासाठी पैसे नसल्याकारणाने सायकलची चोरी केली असल्याचे कबूल केले.
एक तामिळ सिनेमा पाहून सायकल चोरीचे केले अनुकरण
आई-वडिलांचे हातावरील पोट त्यामुळे दोघेही कामाला जातात. घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे आर्थिक अडचण निर्माण झाली. आणि तिथूनच तिने एक तामिळ सिनेमा पाहून सायकल चोरीचा मार्ग स्वीकारला.
पगार मागितल्यानं मालकाला राग अनावर; कामगारासोबत धक्कादायक कृत्य, पोलिसांकडून आरोपीचा शोध
आई-वडिलांनी ठेवलेला विश्वास हा प्रत्येक पाल्याने प्रामाणिकपणे पाळला पाहिजे. पालकांनीही आपल्या पाल्यांशी व्यवस्थित संवाद साधून आपला पाल्य कोणत्या वाईट मार्गाला जात नाही ना यासाठी लक्ष द्यावे, असे आवाहन सोलापूर पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.