सोलापूर 01 डिसेंबर : आपण लग्न किंवा इतर शुभ कार्यामध्ये भेटवस्तू म्हणून फुलांचे बुके देत असतो. परंतु त्या बुके मधील फुले सुकून गेली की तो टाकून द्यावा लागतो. शेकडो रुपये देऊन घेतलेले बुके अवघ्या तासाभरात कचरा कुंडीत जातात. त्यामुळे याला पर्याय म्हणून सोलापुरातील व्यावसायिक ज्ञानेश्वर म्याकल यांनी नॅपकिन बुके बाजारात आणला आहे. त्यांनी नॅपकिन बुके याच व्यवसायातून सात ते आठ घरगुती काम करणाऱ्या महिला कामगारांना रोजगार दिला आहे.
कशा बनवला जातो नॅपकिन बुके?
पुठ्ठा किंवा शीट कार्ड याचा वापर करून विशिष्ट आकारात तो कट केला जातो. त्यानंतर चमकीचे पेपर आणि चिकटपट्टी तसेच स्टेपलरचा वापर करून विशिष्ट आकार देण्यात येतो. आणि त्यामध्ये आकारानुसार नॅपकिनची फुलांच्या आकारात विशिष्ट रचना केली जाते. त्यावर सजावटीच्या टिकल्या, सजावटीचे रिबीन, चमकीच्या टिकल्या आणि आर्टिफिशियल फुले ठेवून प्लास्टिक रॅपर व्यवस्थित गुंडाळले जाते. या प्रकारे नॅपकिन बुके हा तयार होतो. हा नॅपकिन बुके लग्न किंवा इतर शुभ कार्यामध्ये भेटवस्तू आपण देवू शकतो.
आदिवासी महिलांची कला मुंबईकरांच्या घरात पोहचवणारं 'झप्पी', पाहा Video
30 विविध प्रकारच्या आकाराचे बुके
माऊली नॅपकिन बुके यांच्याकडे 30 विविध प्रकारच्या आकाराचे बुके आहेत. आकारानुसार आणि त्यात असणारे टॉवेल आणि नॅपकिन यांच्या संख्येनुसार या बुकेंची किंमत 30 रुपयापासून 899 रुपयापर्यंत आहे.
लॉकडाऊन मध्ये केली सुरुवात
लॉकडाऊनच्या काळात अनेक जणांचे व्यवसाय बंद पडत असल्याने काहीतरी नवा व्यवसाय सुरू करावा या उद्देशाने आमच्या कुटुंबातील सर्वांनी नॅपकिन बुके बनविण्याचा व्यवसाय चालू केला. सुरुवातीला काही मित्रांना हा बुके पाठवून देण्यात आला. ते बुके मित्रांना फार आवडले आणि शहरात प्रत्येक ठिकाणी आम्ही विविध आकारात आकर्षक पद्धतीने बनविण्यास सुरुवात केली, असं माऊली नॅपकिन बुके मालक ज्ञानेश्वर म्याकल यांनी सांगितले.
घरीच बनवा सोलापूरची जगप्रसिद्ध कडक भाकरी, पाहा सिक्रेट रेसिपीचा Video
नॅपकिन बुके बनवू लागल्याने मदत
पहिले मी घरीच कपडे शिवण्याचे काम करीत होते. परंतु आता नॅपकिन बुके बनवू लागल्याने त्यातून आम्हाला आणखी मदत होत आहे असं, नॅपकिन बुके बनवणाऱ्या रेणुका साखरे यांनी सांगितले.
कुठं आहे माऊली नॅपकिन बुके?
माऊली नॅपकिन बुके ,94/282 जोडभावी पेठ, भारतमाता लॅान्ड्री जवळ, कन्ना चौक परिसर, सोलापूर
संपर्क क्रमांक
+91 94210 68131
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.