मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : 'गोंधळ घातला म्हणजे..' सोलापुरातील घटनेनंतर विखे पाटील आक्रमक, म्हणाले त्या शेतकऱ्यांना..

Video : 'गोंधळ घातला म्हणजे..' सोलापुरातील घटनेनंतर विखे पाटील आक्रमक, म्हणाले त्या शेतकऱ्यांना..

सोलापुरातील घटनेनंतर विखे पाटील आक्रमक

सोलापुरातील घटनेनंतर विखे पाटील आक्रमक

सोलापुरात नियोजन भवन येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत शेतकऱ्यांचा गोंधळ पाहायला मिळाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India

सोलापूर, 4 मार्च : सध्या कांद्याला मिळणाऱ्या भावामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आलं आहे. शेतकरी संतप्त झाले असून शेतकऱ्यांच्या आक्रोशाला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सामोरे जावे लागले. सोलापुरात नियोजन भवन येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत शेतकऱ्यांनी गोंधळ घातला. भैया देशमुख यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या गाडीवर कांद्याने आंघोळ घालण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ते निवदेन देण्यासाठी आले असता पोलीस आणि आंदोलनकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याचे पाहायला मिळाले. याचा व्हिडीओ देखील आता समोर आला आहे.

नेमकं काय घडलं?

सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील तब्बल दीड महिन्यानंतर सोलापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी सोलापुरात नियोजन भवन येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या बैठकीत गोंधळ निर्माण झाला. जनहित शेतकरी संघटनेचे प्रभाकर देशमुख यांच्या कांद्याला हमीभाव द्यावा या मागणीसाठी पालकमंत्र्यांच्या भेटीसाठी गेले असता पोलिसांनी रोखले. यावेळी विखे पाटील यांच्या विरोधात शेतकऱ्यांनी घोषणाबाजी केली. भैया देशमुख यांच्यासह शेतकऱ्यांची पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक झाली. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आम्हाला काय गोळ्या घालणार का? असा संतप्त सवाल भैय्या देशमुख यांनी उपस्थित केला. दरम्यान, पोलिसांनी भैय्या देशमुख यांना ताब्यात घेतले.

'नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. खरेदीच्या संदर्भात नाशिकमध्येही प्रश्न उपस्थित झाला होता. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेत नाफेडला कांदा खरेदीच्या सूचना केलेल्या होत्या. सोलापूरमध्ये जर नाफेडतर्फे खरेदी होत नसेल तर चौकशी करण्यात येईल. लगेचच कार्यवाही केली जाईल. अनुदान संदर्भात निर्णय अजून व्हायचा आहे. रॅक्स उपलब्ध होत नाहीत, अशी मागणी आहे. जादा रॅक उपलब्ध करून दिले आणि कांद्याचा उठाव झाला तरी आपोआप भाव वाढण्यात मदत होईल. स्वतः मुख्यमंत्र्यांना अनुदान संदर्भात सांगितले आहे. सरकार याबाबतीत सकारात्मक आहे. पहिल्यांदा नाफेडला कांदा खरेदी करू दे, रॅक उपलब्ध करून कांद्याचा उठाव झाला की मग अनुदान संदर्भातही अंतिम निर्णय होईल', अशी माहिती राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

विखे पाटील काय म्हणाले?

गोंधळ घातले की आपले पुढारीपण सिद्ध होत नाही. एखाद्या गोष्टीचं राजकारण करून तुम्ही माध्यमांसमोर आवाज उठवणार असाल. तर त्यातून प्रश्न सुटेल असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा गैरसमज आहे. नाफेडने काही ठिकाणी कांदा खरेदी सुरू केलं नसल्याचे समोर आलंय. मात्र, काही ठिकाणी रॅक्स नसल्याने ही खरेदी थांबलेली आहे. पालकमंत्री जिल्ह्याला मिळत नाही म्हणून तुम्ही काहीही आरोप करायला लागलात तर हे योग्य नाही. यात तुम्ही राजकारण करत आहात असे दिसून येते. ज्या शेतकऱ्यांनी गोंधळ घातला त्यांच्याशी अजूनही चर्चा करायची आहे. माझी तयारी आहे. त्यांना बोलून घेईन. त्यांच्या मनात काही दुराग्रह असेल तर तो मी दूर करेन, असं आश्वासनही विखे पाटील यांनी दिलं.

First published:
top videos

    Tags: Radha krishna vikhe patil, Solapur