मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लग्न महिन्यावर आलं अन् नियतीनं डाव साधला; तरुणाचा विजेच्या धक्क्यानं दुर्दैवी मृत्यू

लग्न महिन्यावर आलं अन् नियतीनं डाव साधला; तरुणाचा विजेच्या धक्क्यानं दुर्दैवी मृत्यू

निलेश होनराव

निलेश होनराव

बार्शीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी डीपीवर चढलेल्या वीज कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur [Sholapur], India

सोलापूर, 24 मार्च, प्रितम पंडित : बार्शीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी डीपीवर चढलेल्या वीज कर्मचाऱ्याचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. निलेश रामभाऊ होनराव असं या मृत कर्मचाऱ्याचं नाव आहे. बार्शी तालुक्यातील मालवंडी गावात ही घटना घडली आहे. हा विजेचा धक्का एवढा शक्तिशाली होता की, निलेशचा मृतदेह डीपीवरच लटकला. विशेष म्हणजे पंधराच दिवसांपूर्वी निलेशचा साखरपुडा झाला होता. त्याच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरली आहे.

विद्युत पुरवठा कंपनीत कंत्राटी कर्मचारी     

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, निलेश हा विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी बार्शी तालुक्यातल्या मालवंडी गावातील पाटील म्हात्रे यांच्या शेतात असलेल्या विद्युत रोहित्रावर चढला होता. मात्र काम सुरू असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाला. विद्युत पुरवठा सुरू झाल्यानं निलेशचा विजेच्या धक्क्यानं मृत्यू झाला. तो विद्युत पुरवठा कंपनीमध्ये कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होता. घटनेची माहिती मिळताच  महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

लहान भाऊ वेदनेनं तडफडत होता, निर्दयी आरोपीने आवळला गळा; हत्याकांडानं जालना हादरलं 

पंधरा दिवसांपूर्वीच झाला होता साखरपुडा 

दरम्यान निलेश होनराव या तरुणाचा पंधरा दिवसांपूर्वीच मानेगाव येथील एका मुलीशी साखरपुडा झाला होता. 15 मे रोजी लग्नाची तारीख काढण्यात आली होती. निलेशच्या घरी लग्नाची तयारी सुरू होती. मात्र संसार सुरू होण्यापूर्वीच या तरुणाचा दुर्दैवीरित्या मृत्यू झाला आहे. निलेशच्या मृत्यूने गावावर शोककळा पसरिली आहे.

First published:
top videos

    Tags: Crime, Solapur, Solapur news