सोलापुर, 8 फेब्रुवारी : माता रमाबाई आंबेडकर यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त सोलापुरातील यू बुधवार पेठ येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानात दीपोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. आर.एस.मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने हा दीपोत्सव आयोजित करण्यात आला होता. रोटर मशीनचा वापर करुन स्टॅंन्डच्या सहाय्याने यावेळी दिवे प्रकाशित करण्यात आले होते. सर्वांच्या डोळ्याचे पारणे फेडणारा असा हा दीपोत्सव साकार करण्यात आला होता. हा दीपोत्सव पाहण्यासाठी शहर आणी जिल्ह्यातील नागरीकांनी मोठी गर्दी केली होती.
झेंडुच्या फुलांची अनोखी सजावट
हा दीपोत्सव साजरा करण्यासाठी प्रत्येक महिला घरातून मेणबत्त्या घेऊन आल्या होत्या. माता रमाईचे स्मरण करीत त्यांनी ते दिप प्रज्वलित केले. लक्ष दिपांनी सजलेल्या रागोळीमध्ये झेंडुच्या फुलांची अनोखी सजावट नयनरम्य अशी दिसत होती. यावेळी आर. एस. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेचे पद अधिकारी उपस्थित होते.
Solapur : सोलापूरकर घेणार मोकळा श्वास, शहरातील धूळ रोखण्यासाठी पालिकेनं शोधला उपाय, Video
एक दिवा त्यागाचा
माता रमाईना शब्दात मांडणे शक्य नाही. स्वतः झिजून रमाईने आपणा सर्वांना मायेची सावली दिली. भारत देश जो उभा आहे, तो आई रमाईच्या त्यागामुळे आहे. भारतीय संविधानामुळे आपल्याला जगण्यासाठी मोकळा श्वास मिळाला. व हा श्वास मिळवून देणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे फक्त आई रमाईमुळेच घडले. शिवाय त्यांच्या त्यागाचा जागर येणाऱ्या पिढीमध्ये व्हावा यासाठी 'एक दिवा त्यागाचा' हा संकल्प राबला असल्याचे बहुउद्देशीय संस्थेचे रविंद्र सरवदे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.