सोलापूर 22 नोव्हेंबर : शंभर वर्षांपूर्वी सोलापूर हे वस्त्रोद्योग निर्मितीमध्ये देशातील आघाडीचे शहर होते. नर्सिंग गिरजी मिल , जाम मिल, जुनी मिल येथे हजारो कामगार काम करत असतं. आज सोलापुरातीलच तरूणालाच नोकरीसाठी बाहेर जावे लागते ही वस्तूस्थिती आहे.
राजकीय अनास्था आणि लोकप्रतिनिधींचे होणारे दुर्लक्ष यामुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सोलापुरात विमानतळ असूनही विमानसेवा बंद आहे. ही विमानसेवा पुन्हा सुरू करावी यासाठी मागील पंधरा दिवसांपासून शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील मंडळी चक्री उपोषण करत आहेत. या उपोषणामध्ये डॉक्टर ,उद्योजक ,इंजिनियर्स ,मर्चंट नेव्ही अधिकारी, आयटी कंपन्यांचे संचालक, ज्येष्ठ नागरिक असे शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रातील प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. या ठिकाणी स्वाक्षरी अभियान देखील राबवण्यात येत असून त्याला हजारो नागरिकांना पाठिंबा दिला आहे.
काय आहे प्रश्न?
सोलापूरात विमानसेवा नसल्याने कोणतीही आयटी कंपनी सोलापुरात आपले उत्पादन सुरू करू शकत नाही, असा उपोषण करणाऱ्या नागरिकांता दावा आहे. शहरात जवळपास सुमारे 25 अभियांत्रिकी महाविद्यालय आहेत. त्यातून जवळपास प्रत्येक वर्षी 1500 ते 2000 विद्यार्थी पदवी घेऊन बाहेर पडतात.
सोलापूर जिल्ह्यातलं प्लंबरचं गाव, 90 टक्के पुरुष करतात प्लंबिंगचे काम, पाहा Video
सोलापूरात आयटी कंपनी नसल्याने पदवीधर तरुणांना नोकरी करण्यासाठी मुंबई, पुणे ,हैदराबाद, बंगलोर या ठिकाणी स्थलांतर करावे लागते. सोलापुरातील जवळपास 35 ते 40 टक्के युवक हे बाहेरगावी नोकरीला आहेत. नियमित विमानसेवा सुरू झाली तर ही अडचण दूर होईल, असा उपोषण कर्त्यांना विश्वास आहे. आतापर्यंत छोट्या-मोठ्या अशा 245 संस्थांनी या उपोषणाला पाठिंबा दिलाय.
नागरिकांची मागणी काय?
शहरातल्या तरूणांना रोजगार मिळावा, त्यांच्या बुद्धिमत्तेचा वापर शहराच्या विकासासाठी व्हावा यासाठी प्रत्येक लोकप्रतिनिधींनी राजकीय मुद्दा बाजूला सारत प्रयत्न करणे आवश्यक आहे, असं मत सोलापूर विकास मंचच्या केतन शहा यांनी व्यक्त केले.
सोलापूर लवकरच होणार 'सोलारपूर'! नव्या प्रकल्पानं बदलणार शहराचं भविष्य, Video
'मला तरूण म्हणून सर्व सामान्य सोलापूरकरांसाठी काहीतरी करुन दाखवायचं आहे. प्रचंड बुद्धीमत्ता असलेला शहरात तरुण बाहेरगावी नोकरी करतो हे पाहून मला दु:ख होते. विमानसेवा सुरू झाली तर येणारी पिढी सोलापूरातच थांबून प्रगती करू शकते, अन्यथा स्थलांतर अटळ आहे,' असे भाकित विजय जाधव यांनी व्यक्त केलं. तर महापालिकेच्या नवनिर्वाचित आयुक्त शितल उगले यांनी या संदर्भातील संपूर्ण माहिती घेत लवकरच योग्य तो निर्णय घेतला जाईल असं स्पष्ट केलं.
विमानसेवा का हवी?
- चादर, टॉवेल ,युनिफॉर्म या वस्त्र उद्योगातील उत्पादनाना जागतिक बाजारपेठ मिळवण्यासाठी
- युवा पिढीचे स्थलांतर थांबवण्यासाठी तसेच रोजगाराच्या संधीसाठी
- धार्मिक पर्यटन वाढीसाठी
- शेतमालाला जागतिक बाजारपेठ मिळण्यासाठी विमासेवा आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.