मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...तर आषाढीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलवणार, पंढरपूरचे नागरिक आक्रमक

...तर आषाढीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलवणार, पंढरपूरचे नागरिक आक्रमक

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटला आहे. तर दुसरीकडे आता पंढरपूरच्या नागरिकांकडून कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pandharpur, India
  • Published by:  Ajay Deshpande

पंढरपूर :  कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादाचा प्रश्न पेटला आहे. एकीकडे याच प्रश्नावरून विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असताना दुसरीकडे पंढरपूरमधील स्थानिकांनी आता कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा दिला आहे. पंढरपूर कॉरीडोरला स्थानिक नागरिकांचा  विरोध आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिकांकडून आता कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

काय आहे स्थानिकांची मागणी? 

सध्या पंढरपूर कॉरीडोरचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या कॉरीडोरला स्थानिकांकडून विरोध करण्यात येत आहे. कॉरीडोरला विरोध करण्यासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिरच्या पश्चिमद्वाराजवळ नागरिकांनी लाक्षणिक उपोषण देखील केलं आहे. याच पार्श्वभूमीवर स्थानिक नागरिकांकडून आता थेट कर्नाटकमध्ये जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्य सरकारने योग्य दखल न घेतल्यास पुढील आषाढी एकादशीच्या महापुजेला कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना बोलावण्याचा इशारा पंढरपूरमधील नागरिकांनी दिला आहे. त्यामुळे आता वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : 'राज्यपाल मनापासून मराठी व्यक्तीवर प्रेम करणारे, पण...'; अमृता फडणवीसांकडून कोश्यारींची पाठराखण

काय म्हटलं होतं बोम्मई यांनी? 

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील काही गावांवर दावा केला आहे. हा मुळ वाद पाणी प्रश्नावरून सुरू झाला होता. यावर बोलताना बोम्मई यांनी म्हटलं आहे की, सांगली जिल्ह्यातल्या जत तालुक्यातील गावांच्या प्रश्नावर महाराष्ट्र सरकारने गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. यावरून आता आरोप प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं आहे.

हेही वाचा : 'भाजप शिस्तबद्ध पक्ष, बोम्मई असं बोलूच शकत नाहीत, पण...'; सीमावादाबाबत संजय राऊतांचा मोठा दावा

आरोप, प्रत्यारोपाचं राजकारण  

बोम्मई यांच्या वादग्रस्त विधानंतर पुन्हा एकदा सीमावादाचा प्रश्न चर्चेत आला आहे. यावरून आता आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सुरू झालं आहे. विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप करण्यात येत आहेत. तर काँग्रेसच सीमावादाला कारणीभूत असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Karnataka, Pandharpur, Pandharpur news, महाराष्ट्र