मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

सोलापुरातील म्हशीने दिला आगळ्यावेगळ्या रेडकाला जन्म, पाहण्यासाठी लोकांची गर्दी, पाहा VIDEO

सोलापुरातील म्हशीने दिला आगळ्यावेगळ्या रेडकाला जन्म, पाहण्यासाठी लोकांची गर्दी, पाहा VIDEO

फाईल फोटो

फाईल फोटो

मोहोळ तालुक्यातील वडवळ गावात एका काळ्या म्हशीने चक्क पांढऱ्या रेडकाला जन्म दिल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. म्हशीने काळ्या नव्हे, तर चक्क पांढऱ्या रेडकाला जन्म दिला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur, India
  • Published by:  Kiran Pharate

प्रीतम पंडीत, सोलापूर 05 डिसेंबर : अनेकदा आपल्या आसपास अशा काही घटना घडतात, ज्या सगळ्यांनाच चकित करणाऱ्या असतात. नुकतंच पुणे जिल्ह्यातून एक घटना समोर आली होती. ज्यामध्ये बटाट्याच्या झाडाला जमिनीच्या खाली नाही तर चक्क फांद्याना बटाटे आले होते. यानंतर आता सोलापूर जिल्ह्यातून अशीच एक चकित करणारी घटना समोर आली आहे. यात एका म्हशीच्या रेडकाला पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी जमली आहे.

पुणे तिथे काय उणे! टोमॅटोप्रमाणे चक्क झाडाच्या फांदीला लगडले बटाटे, पाहण्यासाठी मोठी गर्दी

मोहोळ तालुक्यातील वडवळ गावात एका काळ्या म्हशीने चक्क पांढऱ्या रेडकाला जन्म दिल्याची दुर्मिळ घटना घडली आहे. म्हशीने काळ्या नव्हे, तर चक्क पांढऱ्या रेडकाला जन्म दिला आहे. या घटनेची परिसरात चर्चा रंगली असून पिल्लाला पाहायला लोक येत आहेत. म्हैस आणि रेडकू या दोघांची प्रकृती चांगली आहे.  पशुवैद्यकीय डॉक्टरांनी याबाबत बोलताना जणुकांच्या मिश्रणामुळे रंगावर परिणाम झाल्याचं सांगितलं आहे.

अंगावर किंवा डोक्यावर एखाद-दुसरा पांढरा ठिपका असणारे म्हशीचे रेडकू अनेक जण पाहतात. मात्र, गाईच्या वासराप्रमाणेच अगदी पांढऱ्या शुभ्र रेडकाला म्हशीने जन्म दिला आहे. वडवळ येथील अल्पभूधारक शेतकरी राजकुमार कोटीवाले हे शेती सोबतच पशुपालनाचा व्यवसाय करतात. त्यांच्या म्हशीने पांढऱ्या रेडकाला जन्म दिला आहे. आतापर्यंत रेडकाच्या अंगावर एखादा पांढरा डाग असल्याचे अनेकांनी पाहिले होते, पण संपूर्ण रेडकूच पांढरे झाल्याची ही दुर्मिळ घटना आहे. या घटनेची परिसरात चर्चा होत आहे.

Video : बदकासमोर हुशाऱ्या नकोच, या तरुणासोबत जे घडलं ते पाहून थांबणार नाही हसू

पुण्यात फांदीला लगडले बटाटे -

निसर्गाच्या चमत्काराची अशीच एक बातमी पुण्यातूनही समोर आली होती. हा अनोखा आविष्कार आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावात पाहायला मिळाला. या गावात बटाटा शेतीत एका झाडाला जमिनीच्या वरती चक्क बटाटे टोमॅटोप्रमाणेच झाडाच्या फांदीला लगडल्याचं पाहायला मिळालं. झाडाच्या फांद्यांना लहान मोठे असे चक्क 17 ते 18 बटाटे मिळून आले. जमिनीत असलेल्या बटाट्याप्रमाणेच हे बटाटे असून थंडीमुळे ते जरा हिरवे पडले होते. झाडाला बटाटे आढळून आल्याने परिसरात हा कुतूहलाचा विषय बनला. शेतकरी , नागरिक झाडाला लगडलेले बटाटे पाहण्यासाठी गर्दी करत होते.

First published:

Tags: Pet animal, Viral videos