प्रीतम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर, 5 डिसेंबर : बार्शीत अपंग निधी मिळावा, यासाठी 15 दिवसांपासून उपोषणाला बसलेल्या दहा वर्षी दिव्यांग बालकाचा मृत्यू झाला आहे. सहभो कुरळे, असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. अपंग निधी मिळावा, यासाठी रामचंद्र कुरुळे यांनी गेल्या पंधरा दिवसापासून चिखर्डे येथील स्मशानभूमी येथे उपोषण सुरू केले होते.
तीन महिन्यात कुंटुंबावर दुसरा आघात -
अपंग निधी मिळावा यासाठी तीन महिन्यापूर्वीही उपोषण केले होते. त्यावेळी वैष्णवी कुरुळे हिचा मृत्यू झाला होता. वैष्णवी कुरुळे हिच्या मृत्यूनंतर तहसीलदार, गट विकास अधिकारी यांनी कारवाईचे आश्वासन दिले होते. मात्र, तीन महिन्यानंतरही आश्वासनाची पूर्ती न झाल्यामुळे कुरुळे कुटुंबियांकडून चिखर्डे येथील स्मशानभूमीत मागील 15 दिवसांपासून उपोषण सुरू केले होते.
चिखर्डे येथील स्मशानभूमीत उपोषण सुरू असताना रविवारी दुपारच्या सुमारास रामचंद्र कुरुळे यांच्या दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला, असा आरोप कुटुंबीयांकडून करण्यात आला आहे. सहभो कुरळे, असे मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे दोन्हीही दिव्यांग बालक दगावण्याचा आरोप कुरुळे कुटुंबाने केला आहे. तसेच संबंधित अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी कुरुळे कुटुंबीयांनी केली आहे.
हेही वाचा - जुळ्या बहिणींशी लग्न करून अडचणीत आला; आता महिला आयोगानेही घेतली दखल, पोलिसांना दिले हे निर्देश
तुला गोळ्या घालतो म्हणत थेट बंदूक काढली, सोलापुरातला धक्कादायक VIDEO समोर -
सोलापूर विमानतळ संदर्भात आंदोलक आणि कारखान्याचे ज्येष्ठ संचालकमध्ये बाचाबाची झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे संचालक काडादी यांनी चक्क खिशातून रि्व्हॉल्व्हर काढून केतन शाह यांना धमकवल्याचा प्रकार समोर आला आहे. या संबंधीचा व्हिडिओही समोर आला आहे.
सोलापूर विमानतळ संदर्भात केतन शाह हे उपोषण करत आहेत. या उपोषणस्थळी येऊन ज्येष्ठ संचालक धर्मराज काडादी यांनी उपोषणकर्ते केतन शाह यांना दमदाटी केली. धर्मराज काडादी आणि केतन शाह यांच्यातील बाचाबाचीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.