मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'...तर मी छोटा पप्पू नाव स्वीकारतो'; आदित्य ठाकरेंचं अब्दुल सत्तारांना आव्हान

'...तर मी छोटा पप्पू नाव स्वीकारतो'; आदित्य ठाकरेंचं अब्दुल सत्तारांना आव्हान

आदित्य ठाकरे म्हणाले, की अब्दुल सत्तार यांनी मला छोटा पप्पू असं नाव दिलं आहे. मी ते नाव स्वीकारतो.

आदित्य ठाकरे म्हणाले, की अब्दुल सत्तार यांनी मला छोटा पप्पू असं नाव दिलं आहे. मी ते नाव स्वीकारतो.

आदित्य ठाकरे म्हणाले, की अब्दुल सत्तार यांनी मला छोटा पप्पू असं नाव दिलं आहे. मी ते नाव स्वीकारतो.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

सोलापूर 09 नोव्हेंबर : शिंदे आणि ठाकरे गटातील आरोप-प्रत्यारोपांची मालिका काही केल्या थांबण्याचं नाव घेत नसल्याचं चित्र आहे. काही दिवसांपूर्वी अब्दुल सत्तार यांनी छोटा पप्पू म्हणत आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. यावर आता आदित्य ठाकरे यांनी जोरदार प्रत्युत्तर देत अब्दुल सत्तारांनाच चॅलेंज दिलं आहे. सत्तारांसमोर एक अट ठेवत आपण हे नाव स्विकारण्यास तयार असल्याचं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

sanjay raut : संजय राऊतांसह प्रवीण राऊत यांनाही जामीन मंजूर, ईडीला मोठा धक्का

आदित्य ठाकरे म्हणाले, की अब्दुल सत्तार यांनी मला छोटा पप्पू असं नाव दिलं आहे. मी ते नाव स्वीकारतो. जर माझं नाव छोटा पप्पू ठेवल्यानंतर तुम्ही ओला दुष्काळ जाहीर करून शेतकरी बांधवांना 24 तासात भरपाई देणार असाल, तर आजपासून मी हे नाव स्विकारतो, असं थेट आव्हान आदित्य ठाकरे यांनी अब्दुल सत्तारांना दिलं आहे.

आदित्य ठाकरे यांनी यावेळी सत्तार यांच्यावर सडकून टीकाही केली. आदित्य ठाकरे म्हणाले की, जनतेला अजूनही कृषिमंत्री माहिती नाही. राज्यात मागच्या दोन महिन्यात झालेल्या पावसाने नुकसानग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पिकांचे अजून काही ठिकाणी पंचनामे झाले नाहीत. दरम्यान राज्यातील कृषीमंत्री यांचा 50 खोकेच्या माध्यमातून दुष्काळ मिटून गेला आहे पण शेतकऱ्यांचा ओला दुष्काळ मिटवण्यासाठी त्यांना वेळ नाही.

अखेर दीपाली सय्यद शिंदे गटात, मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीआधी रश्मी ठाकरेंवर केली टीका

राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत यावर कृषीमंत्री बोलताना दिसत नाहीत. परंतु त्यांना बेताल वक्तव्य करण्यास वेळ असल्याची घाणाघाती टीका ठाकरे यांनी केली. आपल्या राज्यात रोजगारांचा दुष्काळ, ओला दुष्काळ सर्वसामान्य नागरिक हैराण आहे परंतु या सामान्य जनतेच्या प्रश्वावर चर्चा करण्यासा कोणीही तयार नाही. राज्यात खालच्या पातळीवर जाऊन टीका होत असल्याने संस्कृतीला ठेच लागत असल्याचंही आदित्य ठाकरे म्हणाले.

First published:

Tags: Aaditya Thackeray