प्रितम पंडित, प्रतिनिधी
सोलापूर, 18 जानेवारी : सोलापूरमधून अपघाताची मोठी बातमी समोर आली आहे. देवदर्शनासाठी निघालेली भाविकांची ट्रॅव्हल बस उलटली आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. तर 8 जण जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढा तालुक्यातील येद्राव फाटा इथं हा अपघात झाला आहे. देवदर्शनासाठी निघालेली भाविकांची ट्रॅव्हल बस पलटी झाली. भारत यात्रेसाठी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश येथील भाविकांची ट्रॅव्हल बस कर्नाटक इथं देवदर्शनाला गेली होती. देवदर्शन करून पंढरपूरकडे निघाले होते. दरम्यान येद्राव फाटा येथे ड्रायव्हरच्या निष्काळजीपणामुळे बस पलटी झाली अशी प्राथमिक माहिती जखमी प्रवाशांनी दिली आहे.
(Insta Reels Nagpur Crime : Insta reelsसाठी काहीही, बड्या बापाच्या पोरांची कारमधून शहरात हुल्लडबाजी)
या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. यामध्ये 8 गंभीर जखमी झाले आहेत तर 29 जण किरकोळ जखमी झाल्याची माहिती येत आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा अपघात नेमका कशामुळे घडला, याबद्दल अद्याप माहिती समोर आली नाही.
सिलेंडर स्फोटात 2 जणांचा मृत्यू
दरम्यान, रत्नागिरी शहरात शेट्येनगर भागात पहाटे 5 वाजता एका घरात सिलेंडरचा स्फोट झाला. दुमजली चाळीत असलेल्या घरात हा स्फोट झाल्यानंतर घराचं छत कोसळलं आणि यात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. याच घरातून दोघांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. स्फोट इतका भीषण होता की, इतर घरांचंही मोठं नुकसान झालंय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.