मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Solapur : सोलापूर जिल्ह्यातलं प्लंबरचं गाव, 90 टक्के पुरुष करतात प्लंबिंगचे काम, पाहा Video

Solapur : सोलापूर जिल्ह्यातलं प्लंबरचं गाव, 90 टक्के पुरुष करतात प्लंबिंगचे काम, पाहा Video

X
सोलापूर

सोलापूर जिल्ह्यातील वरळेगावातील 90 टक्के पुरुष हे प्लंबिंगचे काम करणारे आहेत. त्यामुळे या गावाची ओळख ‘व्हिलेज ऑफ प्लंबर’ बनली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील वरळेगावातील 90 टक्के पुरुष हे प्लंबिंगचे काम करणारे आहेत. त्यामुळे या गावाची ओळख ‘व्हिलेज ऑफ प्लंबर’ बनली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Solapur [Sholapur], India

सोलापूर, 16 नोव्हेंबर : प्रत्येक गावाची शहर जिल्हा पातळीवर विशिष्ट ओळख ही त्या गावात कोणती गोष्ट प्रसिद्ध आहे यावर असते. जसं साताऱ्यातील अपशिंगे हे गाव सैनिकांचे गाव म्हणून ओळखलं जातं. त्या गावात प्रत्येक घरातील साधारण एक तरी पुरुष हा भारतीय सैन्यात आहे. तसंच वैशिष्ट्य सोलापूर जिल्ह्यातील वरळेगाव या गावाचे आहे. या गावातील 90 टक्के पुरुष हे प्लंबिंगचे काम करणारे आहेत. त्यामुळे या गावाची ओळख ‘व्हिलेज ऑफ प्लंबर’ बनली आहे.

सोलापूर शहरापासून 12 किलोमीटर अंतरावर वरळेगाव हे छोटेसे गाव आहे. या गावाची लोकसंख्या 1200 आहे. साधारणपणे 35 वर्षांपूर्वी गावात खूप मोठ्या प्रमाणात बेरोजगारी होती. या गावाला कोणताही असा नदी किनारा किंवा पाण्याचा साठा न लाभल्याने गावात सर्वच जिरायती शेती होती. त्यामुळे शेती पिकत नसल्यामुळे गावकऱ्यांना काम करण्यासाठी शहरात यावे लागत होते. गावातील अभिमान सुतार व अनिल देवकर हे युवक कोणतेही कौशल्य नसताना सोलापुरात प्लंबरचे काम करू लागले.

Solapur : सहावीतल्या सोहमचा बोलक्या बाहुल्यांचा खेळ पाहून मोठेही होतात थक्क! Video

आज गावात 300 प्लंबर आणि 150 प्लंबर कंत्राटदार

या दोघांच्या प्रेरणेने गावातील बहुतांश तरुण प्लंबर म्हणून काम करू लागले. आज गावात 300 प्लंबर आणि 150 प्लंबर कंत्राटदार आहेत. साधारणतः 1987 या साली या गावात प्लंबिंग या व्यवसायाला सुरुवात झाली

सुरूवातीला माझ्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मी प्लंबिंग हा व्यवसाय स्वीकारला होता. आज या गावात जवळपास 450 जणांना प्लंबिंग शिकवले आहे. याच व्यवसायातून सोलापूर जिल्ह्याच्या जवळपासच्या जिल्ह्यात आणि मुंबई तसेच इतर राज्यातील मोठ मोठी प्लंबिंगची कामे आज गावातील युवक घेत आहेतयाच्यापेक्षा मोठा आनंद आणि समाधान मला दुसरे काहीच नाही, असं अनिल देवकर सांगतात. 

प्लंबरसाठी प्रसिद्ध असलेले गाव कुठेच आढळणार नाही

आज सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर अख्ख्या महाराष्ट्रात प्लंबरसाठी प्रसिद्ध असलेले गाव कुठेच आढळणार नाही. ते यश छोट्याशा वरळेगावने मिळवले आहे. कामातील नैपुण्य गुणामुळे सोलापुरातील मोठी हॉटेल्स, मॉल्स, गृहनिर्माण संस्था, हॉस्पिटल अशा सर्व ठिकाणी काम करणारे प्लंबर वरळेगावचे आढळून येतात, असंही देवकर सांगतात.

Solapur : हैदराबादी मिरचीचे स्पेशल आंध्र भजी, एकदा खाल तर पुन्हा मागाल, Video

गावातील गावकऱ्यांना आपला उदरनिर्वाह चालवण्यासाठी कोणताच आर्थिक मार्ग नव्हता. गावातील पहिले प्लंबर अनिल देवकर यांनी प्लंबिंगच्या व्यवसायातून रोजगार निर्मिती करून दिली, असं नागरिक बालाजी कवडे सांगतात.

First published:

Tags: Local18, Solapur