प्रितम पंडित, सोलापूर 17 नोव्हेंबर : मोहोळजवळील कोळेगाव हद्दीतून एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. मोहोळजवळील कोळेगाव हद्दीत कांदा घेऊन जात असलेल्या पिकअपचा टायर फुटला. यामुळे पिकअप पलटी झाल्याने दोन शेतकऱ्यांसह एकूण तिघांचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील मोहोळजवळील कोळेगाव हद्दीत घडली.
ते 2 हजार रुपये ठरले मृत्यूचं कारण; औरंगाबादमध्ये धक्कादायक अवस्थेत आढळला चालकाचा मृतदेह
अपघातात दत्तात्रय भानुदास शेळके, श्रीमंतसिंग धोडिंराम परदेशी, नितीन बजगे या तिघांचा अपघातात मृत्यू झाला आहे. हे शेतकरी रात्री शेतातून कांदा घेऊन सोलापूर येथील बाजार समितीत लिलाव करण्यासाठी आणत होते. पहाटे दीड वाजताच्या सुमारास वेगात असलेल्या पिकअपचे टायर अचानक फुटले.
टायर फुटल्याने पिकअप पलटी झाला. पलटी झाल्यानंतर गाडीत बसलेले शेतकरी दूर फेकले गेले. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर इजा झाली होती. त्यातच दोघांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात चालक नितीन बजगे गंभीर जखमी झाला होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारादरम्यान सोलापूर येथील शासकीय रूग्णालय त्यांचाही मृत्यू झाला.
या अपघाताची नोंद मोहोळ पोलिसांत झाली असून पोलीस उपनिरीक्षक ज्योतिबा पवार अधिक तपास करीत आहेत.
गोंदियामध्येही भीषण अपघात -
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी डुंगीपार पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या गोंदिया ते कोहमारा मार्गावरही बुधवारी भीषण अपघात झाला होता. या अपघातात एक प्रवासी जागीच ठार झाला. तर इतर दोन प्रवाशांना रुग्णालयात नेत असताना त्यांचा मृत्यू झाला. पाटेकुर्रा गावाजवळ काळी-पिवळी टॅक्सी आणि ट्रकची समोरसमोर धडक झाली. या अपघातात तिघांनी जीव गमावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.