धक्कादायक! मोबाइलवरून झाला राडा आणि शाळकरी मुलाला गळा आवळून दगडाने ठेचलं

धक्कादायक! मोबाइलवरून झाला राडा आणि शाळकरी मुलाला गळा आवळून दगडाने ठेचलं

नान्नज ते मार्डी रस्त्यावर एका शेताजवळ अमीर मुजावर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला.

  • Share this:

सोलापूर, 13 जानेवारी : मोबाइल वापरावरून झालेल्या भांडणातून एका शाळकरी मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना सोलापुरात घडली आहे. मोबालवरून झालेल्या भांडणात अरबाज अयुब शेख या तरुणाने त्याच्यासोबतच्या शाळकरी मुलाला गळा आवळून संपवलं. अमीर मुजावर असं हत्या करण्यात आलेल्या मुलाचं नाव आहे.

सोलापूरजवळी नान्नज इथं मोबाइल वापरत असताना अरबाज आणि अमीर या दोघांमध्ये भांडण झालं. सुरुवातीला मस्करीमध्ये सुरू झालेलं हे भांडण नंतर मात्र टोकाला गेलं. वयाने मोठा असलेल्या अरबाजचा राग टोकाला गेला आणि त्याने अमीरचा गळा आवळला. तसंच त्याच्या तोंडावर दगडाने वारही केले.

'मैत्री'ची हत्या...महागडी कार घेण्यासाठी त्याने मित्राचं अपहरण करून केला खून

नान्नज ते मार्डी रस्त्यावर एका शेताजवळ अमीर मुजावर गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला पोलिसांनी तत्काळ सोलापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

मोबाइलवरून सुरू झालेल्या भांडणातून थेट शाळकरी मुलाची हत्या करण्यात आल्याने नान्नज परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर या प्रकरणातील आरोपी अरबाज अयुब शेख याच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

मोबाइल वापरण्याच्या कारणावरून एका चौदा वर्षांच्या शाळकरी मुलाचा खून झाल्याची खळबळजनक घटना सोलापूरजवळ नान्नज येथे उघडकीस आली. याप्रकरणी एका तरुणाचे नाव संशयित म्हणून समोर आले असून त्याच्या विरुध्द पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 13, 2020 07:32 PM IST

ताज्या बातम्या