मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

VIDEO : डाय करूनही केस पांढरे राहिल्यानं संताप, महिलेची सलून चालकाला बेदम मारहाण

VIDEO : डाय करूनही केस पांढरे राहिल्यानं संताप, महिलेची सलून चालकाला बेदम मारहाण

डाय करूनही केस पांढरेच राहिल्याने महिलेनं ब्युटी पार्लर चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

डाय करूनही केस पांढरेच राहिल्याने महिलेनं ब्युटी पार्लर चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

डाय करूनही केस पांढरेच राहिल्याने महिलेनं ब्युटी पार्लर चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kranti Kanetkar

प्रतिनिधी प्रीतम पंडित, सोलापूर,7 सप्टेंबर : डाय करूनही केस पांढरेच राहिल्याने महिलेनं ब्युटी पार्लर चालकाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोलापुरात डाय करूनही केस पांढरेच राहिले म्हणून सलून मध्ये येऊन महिलेने अक्षरशः राडा घातल्याची घटना समोर आली.

या महिलेने सलूनची तोडफोड करून ब्युटी पार्लर मालकाला चपलने मारहाण केली. सर्व प्रकार कॅमेरामध्ये झाला. मोहम्मद साजिद सलमाने (२२) यांनी सदर बाजार पोलीस ठाणे तक्रार दिली. वर्षा काळे असे मारहाण करणाऱ्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मारहाण झालेल्या व्यक्तीनं पोलिसांना तक्रार दिली आहे.

सोलापूरात सात रस्ता येथे डायमंड नावाचे हेअर सलुन आणि ब्युटी पार्लर आहे. या ठिकाणी 19 ऑगस्ट रोजी वर्षा काळे यांनी येऊन हेअर कट आणि हेअर डाय केले होते. डोक्यावर असलेली सर्व केस काळे केले होते. यासाठी ब्युटी पार्लरवाल्यां दुकानधारकाने 5 हजार रुपये बिल आकारले होते. मात्र याचा कोणताही परिणाम दिसून आला नाही.

तुम्ही केलेले हेअर डाय निघून गेले आहे. माझे केस काळे होण्याऐवजी पांढरेच दिसत आहेत. मला पुन्हा एकदा डाय करून द्या, असे म्हणत ब्युटी पार्लरच्या चालकालाला महिलेनं सांगितलं. त्यावरून दोघांमध्ये वादावादी झाली. संतापलेल्या महिलेने चप्पलने चालकाला मारहाण केली आणि पार्लरची तोडफोड देखील केली.

आम्ही तिच्या डोक्यात पाहिले असता नैसर्गिकरित्या काही केस पांढरे उगवत होते. नैसर्गिकरित्या डोक्यातून पुन्हा नव्याने येणाऱ्या केसांना पुन्हा एकदा काळे करावे लागेल असे सांगितले. पण ती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. तिने चप्पलने मारहाण केली व दुकानातील काचा फोडल्या. याबाबत आम्ही सदर बाजार पोलीस ठाणे येथे फिर्याद दिली आहे असं पीडित ब्युटी पार्लर चालकानं सांगितलं.

First published:

Tags: Crime, Maharashtra News, Solapur