LIVE : सोलापूर महामार्गावर सिलिंडरच्या गाडीला भीषण आग, 10 स्फोटानंतरही स्फोट सुरूच

LIVE : सोलापूर महामार्गावर सिलिंडरच्या गाडीला भीषण आग, 10 स्फोटानंतरही स्फोट सुरूच

औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. यामुळे काही सिलिंडरचा स्फोट झाला.

  • Share this:

उस्मानाबाद, 11 फेब्रुवारी : औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या ट्रकला अचानक आग लागली. यामुळे काही सिलिंडरचा स्फोट झाला. तामलवाडी गावाजवळ ही घटना घडली आहे. या घटनेनंतर दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. कोणतीही जिवितहानी झाली नसून घटनास्थळी अग्निशामक दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या आहेत.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, तामलवाडी गावाजवळ HP गॅस सिलेंडरने भरलेल्या गाडीला अचानक आग लागली. 300 सिलेंडर असणाऱ्या गाडीतील काही सिलिंडरचा स्फोटही झाले. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. उड्डाणपुलावर सायंकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. अजुनही सिलिंडरचे स्फोट होत असून घटनास्थळावर अग्निशामक दलाच्या गाड्या आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करत आहेत.

वाचा : इंदुरीकर महाराज आपल्याच किर्तनामुळे अडचणीत, होणार गुन्हा दाखल

दरम्यान, आग लागल्यानंतर दोन्ही बाजूची वाहतूक थांबवण्यात आली आहे. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव तामलवाडीतील ग्रामस्थांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. घटनास्थळी तुळजापूरचे तहसीलदार सौदागर तांदळे दाखल झाले. त्यांनी घटनास्थळी पाहणी केल्यानंतर प्रसारमाध्यमांना माहिती दिली. सध्या सोलापूर-तुळजापूरची वाहतूक थांबवण्यात आली आहे.

वाचा : औरंगाबाद मनपा निवडणूक वादग्रस्त होण्याची शक्यता, वार्ड रचनेत गोंधळच गोंधळ

First published: February 11, 2020, 8:22 PM IST

ताज्या बातम्या