Home /News /maharashtra /

एक महिन्याच्या बाळाला छातीशी घेऊन पुराच्या पाण्यात अडकली महिला, NDRFचं थरारक रेस्क्यू ऑपरेशन

एक महिन्याच्या बाळाला छातीशी घेऊन पुराच्या पाण्यात अडकली महिला, NDRFचं थरारक रेस्क्यू ऑपरेशन

तनुजा शशिकांत खरात आपल्या 1 महिन्याच्या बाळाला छातीशी घेऊन पुराच्या पाण्याने वेढलेल्या आपल्या घरात मदतीची वाट पाहत होत्या.

मुंबई, 16 ऑक्टोबर : महाराष्ट्राभर मुसळधार पावसाने हाहाकार माजवला आहे. शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत मेहनतीने पिकवलेलं पीक वाहून गेलं. शहरी भागात अनेकांच्या घरात पाणी शिरलं. तर काही ठिकाणी हा पाऊस लोकांच्या जीवावरही उठला. अशातच सोलापूर जिल्ह्यातील एक थरारक कहाणी समोर आली आहे. एक महिन्याच्या बाळ आणि बाळंतिणीची पुरातून सुटका करण्यात आली आहे. तनुजा शशिकांत खरात आपल्या 1 महिन्याच्या बाळाला छातीशी घेऊन पुराच्या पाण्याने वेढलेल्या आपल्या घरात मदतीची वाट पाहत होत्या. सोलापूरमध्ये पाथरी गावातील ही माय आपल्या चिमुकल्यासह मदतीसाठी देवाचा धावा करत होती. त्यावेळी NDRFचे जवान या दोघांसाठी देवदूत बनून मदतीसाठी धावले. या जवानांनी या मायलेकराला सुखरूप सुरक्षित स्थळी हलवलं. एरवी कणखर दिसणाऱ्या जवानांनी या चिमुरड्याला हळुवार हातांनी आपल्या कुशीत घेतलं आणि सुरक्षित ठिकाणी आणलं. एकीकडे मृत्यू डोळ्यासमोर दिसत असताना तनुजा खरात आणि त्यांच्या बाळासाठी NDRF जवानांनी प्रयत्नांची शर्थ केली. त्यामुळे या जवानांचं सर्वत्र कौतुक होत आहे. दुसरीकडे, सीना नदीच्या पात्रात अडकलेल्या 33 वर्षीय तरुणाचीही सुटका करण्यात आली आहे. म्हशीला चारा द्यायला गेलेले मोहसीन शेख नदीच्या वाढलेल्या पाण्यामुळे शेतातच अडकून राहिले. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर एनडीआरएफचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मोहसीन यांना सुरक्षित स्थळी हलवलं. सोलापूर जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ सोलापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे तसेच धरणातून सोडलेल्या विसर्गामुळे नदी पात्रात पाण्याचा प्रवाह मोठ्या तीव्रतेने सुरु आहे. नदी पात्राच्या काठावरील कुटुंबाना सुरक्षितस्थळी हलविण्याचे काम प्रशासनाच्या व बचाव पथकाच्या मदतीने सुरू आहे. पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील तीन नागरिकांना आज वजीर रेसक्यु फोर्सच्या मदतीने नदीच्या पाण्यातून सुखरुप  बाहेर काढले आहे. तसेच कौठाळी येथून व्हाईट आर्मीच्या मदतीने नागरिकांना पुराच्या पाण्यातून सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे.

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Rain updates, Solapur, Solapur news

पुढील बातम्या