सोलापूर, 07 नोव्हेंबर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. दोन वाहनांच्या धडकेत चालकाचा जागीच मृत्यू झाला तर महिला जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. हा अपघात इतका भीषण होता की गाडीचा जागीच चुराडा झाला आहे. या भीषण अपघाताचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. वाखारी गावाच्या हद्दीत दोन वाहनांमध्ये ही धडक झाली.
मिळालेल्या माहितीनुसार पहाटेच्या सुमारास सिमेंटची वाहतूक करणारा बल्क टँकर सोलापूरहून पुण्याच्या दिशेनं जात होता. त्यावेळी चालकाचा अंदाज चुकल्यानं समोरून येणाऱ्या मालवाहू ट्रकवर हा टँकर धडकला आहे. यामध्ये बल्क टँकरचा चुराडा झाला आहे.
सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, वाहनाचा चुराडा तर चालकाचा जागीच मृत्यू pic.twitter.com/SsNnzXH9PZ
हे वाचा-पतीच्या मृत्यूनंतर पार्थिवाजवळच सोडला पत्नीनं जीव, बॅंडबाजासह निघाली अंत्ययात्रा
चालकाचा अंदाज चुकल्याने पुढे चाललेल्या मालट्रकवर हा टँकर जोरदारपणे धडकला यामध्ये बल्क टॅकरच्या केबिनच्या अक्षरश: चुरा झाला आहे. या अपघातात सिमेंटची वाहतूक करणाऱ्या बल्क कंटेनर चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली.
अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कंटेनर आणि चालकाचा मृतदेह ताब्यात घेतला असून पुढील तपास सुरू आहे. गाडी चालवताना अंदाज चुकल्यानं हा अपघात झाल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात एक जण किरकोळ जखमी देखील झाल्याची माहिती मिळाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.