Home /News /maharashtra /

गर्भवती महिला सासूसोबत मध्यरात्री चालत निघाली रुग्णालयात, मदतीला धावले पोलीस

गर्भवती महिला सासूसोबत मध्यरात्री चालत निघाली रुग्णालयात, मदतीला धावले पोलीस

मध्यरात्री महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तेव्हा रुग्णालयात जाण्यासाठी कोणतीही वाहतूक व्यवस्था उपलब्ध नव्हती.

    सोलापूर, 22 एप्रिल : देशात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यातही महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. यामुळे लोकांना घरातून बाहेर पडण्यास बंदी आहे. या परिस्थितीत लोकांना अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याच गोष्टी उपलब्ध नाही. यातही अत्यावश्यक सेवा मिळण्यात अडचणी येतात. तेव्हा कोरोनाला रोखण्यासाठी अहोरात्र झटणाऱे आरोग्य कर्मचारी, पोलीस, प्रशासन नागरिकांच्या मदतीला धावून येत आहे. अशीच एक घटना सोलापूरात घडली आहे. मध्यरात्री महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्या. तेव्हा रुग्णालयात जाण्यासाठी कोणतीही वाहतूक व्यवस्था उपलब्ध नव्हती. शेवटी रात्री बाराच्या सुमारास प्रसूती वेदना सहन करत महिला तिच्या पती आणि सासूसोबत चालत निघाली होती. गडद अंधारात तिघेच रुग्णालयाकडे निघाले होते. तेव्हा सोलापूर शहरात पोलीस गस्त घालत होते. त्यांना तिघेजण रात्रीचं चालत निघालेले दिसताच त्यांची चौकशी केली. गर्भवती महिलेच्या सासूने पोलिसांसमोर आपली हकीकत मांडली. ती म्हणाली की, सुनेच्या पोटात दुखतंय. तिला दवाखान्यात न्यायचं आहे पण रिक्षासुद्धा नाही. पोलीस गाडी पकडतात म्हणून कोणी गाडी द्यायला तयार नाही. इथल्या दवाखान्यात जायचं म्हणून आलो पण इथं कुलुप. आता सिव्हिल रुग्णालयात चालत निघालोय सोलापूर शहरातील सलगर वस्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आनंदा पाटील आणि त्यांचे सहकारी गस्त घालत होते. दरम्यान, त्यांना दोन महिला आणि एक पुरुष रस्त्यावर चालताना दिसले. त्यांची विचारपूस केल्यावर पोलिसांना त्यांची अगतिकता आणि हतबलता लक्षात आली. हे वाचा : कोरोनाशी लढणाऱ्या आशा वर्कर्संना धक्कादायक वागणूक, वाट्याला आल्या दगडफेक, शिव्या सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय आनंदा पाटील आणि त्यांचे सहकारी सोबत होते. महिलेनं तिची अडचण सांगताच पोलिसांनी त्यांच्या गाडीतून गर्भवती महिलेसह तिच्यासोबत असलेल्यांना रुग्णालयात पाठवलं. मध्यरात्री धावून आलेल्या या खाकी वर्दीतल्या माणसांमुळे गर्भवती महिलेची सासू भावुक झाली. पोलिसांनी केलेल्या या मदतबद्दल त्यांच्या इतर सहकाऱ्यांसह सर्वांनिच कौतुक केलं. हे वाचा : 'Corona ची लागण किंवा मृत्यूचं भय नाही पण...', कोरोना योद्धांनी मांडली व्यथा संपादन - सूरज यादव
    Published by:Suraj Yadav
    First published:

    Tags: Coronavirus

    पुढील बातम्या