सोलापूर, 18 जानेवारी : राज्यभरातील विविध ग्रामपंचायतींच्या निवडणूक निकाल जाहीर होत असून विजयी उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष केला जात आहे. मात्र वातावरणात तणाव निर्माण होऊ नये म्हणून अनेक जिल्ह्यांमध्ये निवडणूक निकालानंतर मिरवणूक काढण्यास प्रशासनाकडून मनाई करण्यात आली आहे.
सोलापूर जिल्ह्यातही गुलाल उधळणे, विनापरवाना बॅनर लावणे आणि विजयी मिरवणूक काढण्यास मनाई करण्यात आली होती. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी याबाबतचे आदेश दिले. मात्र असं असतानाही बार्शी तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीतील विजयानंतर काही कार्यकर्ते गुलाल उधळत जल्लोष करत होते. या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या लाठीचा प्रसाद खावा लागला आहे.
बार्शीत जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सौम्य लाठीमार केल्याचं पाहायला मिळालं.
सोलापूरमध्ये काय आहे निवडणूक निकालाचं चित्र?
- अक्कलकोट तालुक्यातील हालहळ्ळी
(अ) ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीच्या पॅनेलची सत्ता
- हालहळळी (अ) गावातील बिराजदार यांच्या पॅनलला 6 पैकी 6 जागांवर विजयी
- अक्कलकोटमध्ये भाजपला धक्का
- बार्शी तालुक्यातील मळेगावमध्ये 45 वर्षानंतर पहिल्यांदा निवडणूक
- निवडणुकीत विद्यमान सरपंचाचे नर्मदेश्वर विकास आघाडीचा विजय
- 11 पैकी 9 जागांवर नर्मदेश्वर विकास आघाडीचा विजय
- माढा तालुक्यातील घाटणे ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीच्या रवी देशमुख गटाकडे सत्ता
- रवी देशमुख गटाचे 7 पैकी 5 उमेदवार विजयी
राज्यभर शिवसेनेची जोरदार मुसंडी, आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया
NOTA जोमात; उमेदवार कोमात! मतदारराजा जेव्हा सगळ्यांनाच नाकारतो...
- बळीराजा शेतकरी संघटनेच्या संजय पाटील घटणेकरांना धक्का
- अक्कलकोट तालुक्यातील बादोले आणि बबलाद ग्रामपंचायतीत कॉंग्रेसची सत्ता
-बबलाद ग्रामपंचायतीत राजकुमार लकबशेट्टी यांच्या पॅनलला 9 पैकी 6 जागा
- बादोले ग्रामपंचायतीत कॉंग्रेसच्या माणिक धायगोडे यांची निर्विवाद सत्ता
- बादोलेतील 11 च्या 11 जागांवर धायगोडे गटाचे उमेदवार विजयी
- अक्कलकोटमध्ये भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांना मोठा धक्का
- कॉंग्रेसचे माजी आमदार सिद्धराम म्हेत्रे यांची आघाडी
- दक्षिण सोलापूर तालुक्यातील गुंजेगाव येथे कॉंग्रेसच्या सत्ताधारी हसापुरे गटाचा पराभव
- शिवसेनेचे दिलीप माने गटाच्या स्थानिक परिवर्तन आघाडीला मोठे यश
- 9 पैकी 9 जागांवर दिलीप माने गट विजयी.
- दक्षिण सोलापुरातील कुंभारी ग्रामपंचायतीची सुत्रे भाजपकडे
- जिल्हापरिषदेचे साभागृहनेते आण्णाराव बाराचारे आणि शिरीष पाटील गट विजयी
- 17 पैकी 13 जागांवर भाजपचा विजय
- तर पंचायत समितीचे माजी उपसभापती आणि कॉंग्रेस
चे आप्पासाहेब बिराजदार यांना 4 जागा स्वतः अप्पासाहेब बिराजदार पराभूत