माढा, 13 मार्च: अकरा वर्षांच्या एका मुलाच्या घशात अन्नाचा घास अडकल्याचं निमित्त झालं आणि त्यात त्याचा जीव गेला. सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील वडाची वाडी इथली ही घटना आहे. महाशिवरात्रीच्याच दिवशी अन्नाचा घास घशात अडकल्याने गुदमरून मृत्यू (11 year old boy death after Eating sabudana) झाल्याची घटना समोर आली आहे. संबंधित मुलगा जेवत असताना अन्नाचा घास त्याच्या घशात अडकला. त्यामुळे त्याला ठसका लागला आणि श्वासोच्छवास घेण्यास अडथळा येऊ लागले. त्यामुळे नातेवाईकांनी त्याला माढा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं. पण तत्पूर्वी त्याचा जीव गेला होता. या 11 वर्षांच्या अल्पवयीन मुलाचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित 11 वर्षीय मृत मुलाचं नाव रोहन सिद्धेश्वर निळे असं असून तो माढा तालुक्यातील वडाची वाडी येथील रहिवासी आहे. रोहनच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन हा दिव्यांग होता. त्याला अधून मधून झटकेही येत होते. गुरूवारी महाशिवरात्री निमित्त घरात साबुदाना करण्यात आला होता. या मुलाने दुपारी 4 च्या सुमारास हा साबुदाना खाल्ला होता. मात्र जेवणानंतर त्याला अस्वस्थ वाटू लागलं. त्यामुळे त्याला माढ्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण त्यानंतर त्याची रवागनी माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. मात्र उपचारापूर्वीच तो मरण पावला होता.
दैनिक पुढारीने दिलेल्या वृत्तानुसार, रोहनला गुरुवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास माढा ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं होतं. पण ग्रामीण रुग्णालयातील डॉ. सदानंद व्हनकळस यांनी रोहनचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं. यानंतर रोहणवर माढ्यातील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मित मृत्यू म्हणून केली आहे.
हे ही वाचा-नोकरीसाठी पैसे आणि शरीरसुखाची मागणी, जिल्हा परिषदेतील धक्कादायक प्रकार
याबाबत माढा ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, रोहन जेवण करताना त्याला ठसका लागला. त्यामुळे अन्ननलिकेतील घास श्वसनलिकेत अडकला. यामुळेच त्याचा गुदमरून मृत्यू झाला आहे. ऐन महाशिवरात्रीच्या दिवसी या बालकाचा अशा पद्धतीनं मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.