सोलापूर, 1 मार्च : एखाद्या आईची आपल्या मुलासाठी असणाऱ्या मायेची कशासोबतच तुलना होत नाही, असं म्हटलं जातं. याच मायेतून मुलासाठी आई आपला जीवही धोक्यात घालते. सोलापुरातही अशीच एक काळीज पिळवटून टाकणारी घटना समोर आली आहे.
सोलापूर शहरात विजेचा धक्का बसून माय-लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. सकाळी पिण्याचे पाणी भरत असताना शॉर्टसर्किटमुळे पाणी भरण्याच्या गडबडीत आधी मुलाला विजेचा धक्का बसला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या आईलाही विजेचा धक्का बसला. त्यामुळे या धक्क्यात आई आणि मुलगा जागीच मृत्यू पावल्याची घटना घडली आहे.
शशिकला गंजी आणि अजय गंजी असे या मृत माय-लेकाचा नाव आहे. सोलापूर शहरातील रविवार पेठ भागातील विणकर उद्यानाच्या मागील बाजूस ही घटना घडली. या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा- मस्करीत तरुणाकडून रिव्हॉल्व्हरचा स्ट्रिगर दबून सुटली गोळी.. क्षणात खेळ खल्लास
सोलापूर शहरात तीन दिवसाआड एकदा पाणी येते. त्यामुळे पाण्यासाठी नागरिकांची मोठी धांदल उडते. तशीच धांदल या गंजी कुटुंबाची उडाली होती. मात्र वायर शॉर्ट झाल्याने विजेच्या धक्क्यात या दोघांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.