Home /News /maharashtra /

सोलापुरात मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा टेंभुर्णीजवळ अडवला, धैर्यशील मोहिते-पाटलांच्या नेतृत्वात ठिय्या

सोलापुरात मराठा समाजाचा आक्रोश मोर्चा टेंभुर्णीजवळ अडवला, धैर्यशील मोहिते-पाटलांच्या नेतृत्वात ठिय्या

Maratha Reservation Akrosh Morcha: सोलापुरातील (Solapur) मराठा आरक्षण (Maratha Reservation) आक्रोश मोर्चा टेंभुर्णीजवळ अडवण्यात आला आहे.

    सोलापूर, 04 जुलै: सोलापुरातील (Solapur) मराठा आरक्षण (Maratha Reservation) आक्रोश मोर्चा टेंभुर्णीजवळ अडवण्यात आला आहे. आंदोलकांना अकलूजच्या टेंभुर्णीजवळ अडवल्यानं आंदोलक आणि प्रशासनात तणाव वाढला आहे. धैर्यशील मोहिते आणि नरेंद्र पाटील (Narendra Patil) यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केलं जात आहे. (Maratha Akrosh Morcha) सोलापुरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतरही मराठा संघटनांच्या आंदोलकांनी आक्रोश मोर्चा काढला. मोर्चासाठी शेकडो कार्यकर्ते सोलापुरात दाखल झाले आहेत. त्यानंतर पोलिसांकडून मोर्चा अडवण्यात आला. मोर्चावेळी 100 पेक्षा जास्त गाड्या सोलापूरकडे रवाना झाल्या. या गाड्यांमध्ये माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील , धैर्यशील मोहिते पाटील यांचाही समावेश आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी आंदोलनाला परवानगी दिली नव्हती. मात्र आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम होते. सोलापूर शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक या ठिकाणाहून दुपारी 12 वाजता मोर्चाला सुरुवात झाली. यावेळी पोलिसांनी लावलेले बॅरिकेट्स ओलांडून आंदोलक आंदोलनस्थळी दाखल झाल्याचं दिसलं. मोर्च्याच्या पार्श्वभूमीवर शहरात 2 हजार ग्रामीण भागात 2 हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे. शहरात येणारे सर्व मार्गांवर नाकेबंदी करण्यात आली आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Maratha reservation, Solapur

    पुढील बातम्या