Home /News /maharashtra /

सोलापूर: कम्युनिस्ट पक्षाने दिला आंबेडकरांना पाठिंबा, शिंदेंच्या अडचणीत वाढ होणार?

सोलापूर: कम्युनिस्ट पक्षाने दिला आंबेडकरांना पाठिंबा, शिंदेंच्या अडचणीत वाढ होणार?

सोलापूरमधून सुशिल कुमार शिंदे पिछाडीवर, भाजपचे स्वामी यांनी घेतली आघाडी

सोलापूरमधून सुशिल कुमार शिंदे पिछाडीवर, भाजपचे स्वामी यांनी घेतली आघाडी

सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सीपीआयएम अर्थात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

    सोलापूर, 04 एप्रिल: सोलापूर लोकसभा मतदारसंघातून सीपीआयएम अर्थात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने वंचित बहुजन आघाडीच्या प्रकाश आंबेडकरांना जाहीर पाठिंबा दिला आहे. सीपीआयएमचे नेते आणि माजी आमदार नरसय्या आडम यांनी गुरुवारी ही माहिती दिली. डाव्या पक्षाने घेतलेल्या या निर्णयामुळे काँग्रेसचे उमेदवार आणि देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. १९५२ साली बाबासाहेब आंबेडकरांच्या झालेल्या पराभवाचे दु:ख दूर करण्यासाठी त्यांच्या नातवाला पाठिंबा देत असल्याचे आडम यांनी सांगितले. आडम आणि डाव्या पक्षांनी प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा दिल्याने शिंदे यांची डोकेदुखी वाढणार असल्याची चर्चा मतदारसंघात सुरु झाली आहे.सोलापूरमध्ये 18 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुक 2019 लोकसभा निवडणुकांच्या (LokSabha Elections 2019) तारखा जाहीर झाल्या आहेत. देशभरात सात टप्प्यांमध्ये 11 एप्रिल ते 19 मे यादरम्यान निवडणुका होतील. नवी दिल्लीमध्ये रविवारी निवडणूक आयोगाने (Election Commission) या तारखांची घोषणा केली. देशात सात टप्प्यांत तर महाराष्ट्रात चार टप्प्यांत लोकसभा निवडणुका होतील. 11 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रात 7 जागांसाठी मतदान होणार- वर्धा, रामटेक, नागपूर, भंडारा- गोदिया, गडचिरोली- चिमूड, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम 18 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 10 जागांवर होणार मतदान- बुलडाणा, अकोला, अमरावती, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर 23 एप्रिल रोजी तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 14 जागांवर होणार मतदान जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदूर्ग, कोल्हापूर, हातकणंगले 29 एप्रिल रोजी चौथ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 17 जागांवर होणार मतदान नंदूरबार, धुळे दिंडोरी, नाशिक, पालघर, भिंवडी, कल्याण, ठाणे, मुंबई- उत्तर, मुंबई- उत्तर- पश्चिम, मुंबई -उत्तर - पूर्व, मुंबई- उत्तर -मध्य, मुंबई - दक्षिण - मध्य, मुंबई- दक्षिण, मावळ, शिरूर, शिर्डी लोकसभा निवडणूक 2014 महाराष्ट्रात 2014 च्या निवडणुकीत भाजप - शिवसेना युती आणि काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी अशी सरळ स्पर्धा होती. राज्यातल्या लोकसभेच्या 48 जागांपैकी 41 जागा राष्ट्रीय लोकशाही आघाडीने अर्थात भाजप- सेना युतीने जिंकल्या आणि काँग्रेस आघाडीचा सपशेल पराभव झाला. काँग्रेसला फक्त 2 जागा जिंकता आल्या तर राष्ट्रवादीने केवळ 4 जागा राखल्या. महाराष्ट्र 2014 चं पक्षीय बलाबल एकूण जागा 48 भाजप 23 सेना 18 राष्ट्रवादी काँग्रेस 4 काँग्रेस 2 स्वाभिमानी शेतकरी पक्ष 1 SPECIAL REPORT : हेच 'ते' महिलांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणारे बेताल नेते!
    First published:

    Tags: Election 2019, Lok sabha election 2019, Maharashtra Lok Sabha Elections 2019, Prakash ambedkar, Solapur S13p42

    पुढील बातम्या