मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Corona Vaccination सोलापूरच्या केंद्राचा आदर्श, डोस वाया जाण्याचे प्रमाण 0, क्षमतेपेक्षा अधिक लसीकरण

Corona Vaccination सोलापूरच्या केंद्राचा आदर्श, डोस वाया जाण्याचे प्रमाण 0, क्षमतेपेक्षा अधिक लसीकरण

solapur ideal corona vaccination center  याठिकाणी लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरण करण्यासाठी अनेकदा जवळच्या गावांमधून किंवा बाहेरगावचे लोक येतात. अशांसाठी चहा, नाश्त्याची सोयही करण्यात आली आहे.

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

सोलापूर, 13 मे : कोरोनाचा (Coronavirus) सामना करण्यासाठी लवकरात लवकर लसीकरण (Vaccination) होणं हे अत्यंत गरजेचं आहे. पण राज्यात कोरोना लसींचा तुटवड्यामुळं (corona Vaccine shortage) सध्या तरी कोरोनाच्या लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लशींचा पुरवठा आणि लसीकरण मोहीम यात केंद्र सरकारचं नियोजनही पुरेसं ठरत नसल्याचं दिसतंय. मात्र सोलापूरमध्ल्या (Solapur) एका लसीकरण केंद्रानं (Vaccination Center) लसीकरण नियोजनाचा आदर्श घालून दिला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी मिळालेल्या डोसपेक्षा अधिक नागरिकांचं लसीकरण होत आहे.

सोलापूरमध्ये कोरोनाच्या लसीकरणासाठी व्यवस्था करण्यात आलेल्या विविध लसीकरण केंद्रांपैकी एक म्हणजे शेठ गोविंदजी रावजी आर्युर्वेद महाविद्यालय याठिकाणी असलेले लसीकरण केंद्र. याठिकाणी महानगर पालिकेच्या वतीने लसीकरणाची सोय करण्यात आलेली आहे. मात्र त्याचबरोबर काही सामाजिक संघटना आणि स्थानिक नेत्यांनी एकत्र येत या केंद्राला आदर्श केंद्र बनवलं आहे.

(वाचा-हायकोर्टाने पोलखोल केल्यानंतर पुणे पालिका वठणीवर, कॉल सेंटरची यंत्रणाच बदलली!)

याठिकाणी अत्यंत नियोजनबद्धरित्या लसीकरणाची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. लसीकरणासाठी येणाऱ्यांना जास्त वेळ रांगेत उभं राहावं लागत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळत आहे. मात्र याठिकाणी लसीकरणासाठी येणाऱ्या प्रत्येकाच्या बसण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. लसीकरण करण्यासाठी अनेकदा जवळच्या गावांमधून किंवा बाहेरगावचे लोक येतात. अशांसाठी चहा, नाश्त्याची सोयही करण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यासाठी हातभार लावला आहे. तसेच योग्य नियोजन होण्यासाटी स्वयंस्फुर्तीनं काही लोक मदतीसाठी याठिकाणी उपस्थित असतात. लोकांना नोंदणीसाठी मदत करणे, सोशल डिस्टन्सिंग पाळली जाते का यावर लक्ष ठेवणे यात हे लोक मदत करतात. वृद्ध, ज्येष्ठ नागरिक किंवा चालण्यास त्रास होतो अशा दिव्यांगांना ते आहेत तिथ जाऊनही लसीकरण केलं जात आहे.

(वाचा-भारत बायोटेकमध्ये खळबळ, व्हॅक्सिन बनवणाऱ्या कंपनीतील 50 कर्मचारी पॉझिटिव्ह)

या लसीकरण केंद्राचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे इथं लसीचे डोस वाया जाण्याचं प्रमाण 0 टक्के आहे. उलट जेवढे डोस येतात त्यापेक्षा अधिक लोकांचं लसीकरण इथं केलं जात आहे. लसीच्या बाटलीमध्ये डोस वाया जाण्याची शक्यता पाहता एक डोस किंवा थोडं औषध अधिकचं असतं. त्याचा योग्य पद्धतीनं वापर करून जास्त लोकांचं लसीकरण केलं जात आहे. या केंद्रावर 5 तारखेला 100 डोसेस मिळाले त्यात 107 जणांचे लसीकरण झाले. तर 6 तारखेला 200 डोसमध्ये 229 जणांचे आणि 12 तारखेला 575 डोसमध्ये 600 जणांचं लसीकरण झालं. एबीपी माझानं याबाबतचं वृत्त दिलं आहे.

कोरोनाच्या लढाईतील अत्यंत महत्त्वाचा असा टप्पा म्हणजे लसीकरण आहे. या केंद्रांवर जर योग्य पद्धतीनं नियोजन केलं आणि चांगल्या प्रकारे प्रयत्न केले तर नागरिकांचा लसीकरणाचा अनुभव चांगला होईल आणि लसीकरण करून घेणाऱ्यांचं प्रमाणही वाढेल.

First published:

Tags: Corona vaccination, Sanjeevani, Solapur news