Home /News /maharashtra /

गुरुनाथ कटारे हत्या प्रकरणातील आरोपींना अखेर जन्मठेप, CID भरारी पथकाची कामगिरी

गुरुनाथ कटारे हत्या प्रकरणातील आरोपींना अखेर जन्मठेप, CID भरारी पथकाची कामगिरी

गुरुनाथ कटारे हत्या प्रकरणात एकूण चार आरोपी निष्पन्न झाले.

    गोविंद वाकडे, पुणे, 31 जानेवारी : सोलापूरमध्ये 2014 साली झालेल्या गुरुनाथ कटारे हत्या प्रकरणातील आरोपींना अखेर जन्मठेप सुनावण्यात आली आहे. 2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान गुरुनाथ कटारे याचा काही व्यक्तींनी वळसंबग जि. सोलापूर येथे सत्तूर आणि तलवार यासारख्या धारदार शस्त्रांनी खून केला होता. गुरुनाथ कटारे हत्या प्रकरणात एकूण चार आरोपी निष्पन्न झाले. प्राथमिक तपास वळसंग पोलीस स्टेशनने केला. त्यानंतर दोन महिन्यांनी हा गुन्हा भरारी पथक 2 राज्य गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे यांच्याकडे वर्ग झाला. त्यानंतर सदर गुन्ह्यात सखोल तपास करुन तीन आरोपींविरुद्ध सोलापूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलं. या खटल्यात सुनावणीदरम्यान निष्पन्न झालेल्या तीनही आरोपी प्रमोद उर्फ किंग भाई स्वामी , जगदीश उर्फ पिंटू कोन्हेरीकर व प्रदीप उर्फ दिपक मठपती यांना भा.द.वि. कलम 302, 102 ब सह 34 या खाली जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. सदर गुन्ह्याच्या तपासात आणि कोर्ट सुनावणीच्या दरम्यान न्यायालयात सतत पाठपुरावा करुन राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे अपर पोलीस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीणकुमार साळुंखे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली माने यांनी मार्गदर्शन करुन मोलाची भूमिका बजावली. सदर गुन्ह्याचा तपास श्री. विलास भोसले पोलीस उपअधीक्षक भरारी पथक यांनी केला.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: #Pune, CID, Solapur

    पुढील बातम्या