सुनावणी सुरू असताना आरोपीचा लोखंडी राॅडने न्यायाधीशांवर हल्ला

सुनावणी सुरू असताना आरोपीचा लोखंडी राॅडने न्यायाधीशांवर हल्ला

आरोपीने चक्क लोखंडी राॅडने न्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यातून न्यायाधीश थोडक्यात बचावले.

  • Share this:

02 नोव्हेंबर : सोलापुरात एका शिक्षेतील आरोपीने चक्क न्यायाधीशाला न्यायासनावर जाऊन मारहाण करण्याचा प्रयत्न केलाय. आरोपीने चक्क लोखंडी राॅडने न्यायाधीशावर हल्ल्याचा प्रयत्न केला. सुदैवाने या हल्ल्यातून न्यायाधीश थोडक्यात बचावले.

सोलापूर जिल्हा न्यायालयात सुनावणी सुरू असताना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी स्मिता माने यांच्यावर एका माथेफीरू आरोपीने लोखंडी रॉडने हा हल्ला केला. या हल्ल्यात न्याय दंडाधिकारी या बचावल्या असून त्यांच्या आसनावरील कम्प्युटर मात्र फुटला आहे. व्यंकटेश यल्लाप्पा बंदगी असं या आरोपीचं नाव असून त्याच्यावर घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. एटीएम फोडण्याच्या गुन्ह्यात आरोपी बंदगीला एप्रिल २०१३ साली शिक्षा झालेली होती. तसंच आणखी गुन्ह्यात तो आरोपी आहे.

सोलापूर शहरातील न्यायाधीशाला मारण्याची ही तिसरी घटना आहे. दरम्यान, न्यायदंडाधिकाऱ्यांच्या न्यायासनावर जाऊन हल्ला करण्याची ही दुर्मिळ घटना आहे. मात्र एकादा व्यक्ती सुनावणी सुरू असताना एखाद्या न्यायादंडाधिकाऱ्यांना मारहाण करत असेल तर मात्र सुरक्षेबाबत निश्चितच प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय.

First published: November 2, 2017, 8:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading