सोलापुरातील किराणामालाचा व्यवसाय असणाऱ्या कुटुंबाला कोरोनाची लागण, ग्रामीण भागात चिंता

सोलापुरातील किराणामालाचा व्यवसाय असणाऱ्या कुटुंबाला कोरोनाची लागण, ग्रामीण भागात चिंता

वैराग येथील होलसेल किराणा दुकानदाराची अकलूज येथील बहीण व भाचा हे देखील मंगळवारच्या अहवालात कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

  • Share this:

सोलापूर, 27 मे : महाराष्ट्रातील मोठ्या शहरांमध्ये कोरोनाचं थैमान सुरू असताना हा धोकादायक व्हायरस आता ग्रामीण भागातही पोहोचला आहे. तसंच कोरोना व्हायरसने आतापर्यंत अनेक पोलिसांनाही टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यातच आता सोलापूर शहर पोलीसमध्ये कार्यरत असलेले पोलीस शिपाई आजारी असल्याने पाच दिवसांपूर्वी बोरामणीला (ता. दक्षिण सोलापूर) गेले आणि आई- वडिलांसोबत राहिले. मंगळवारी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. वैराग येथील होलसेल किराणा दुकानदाराची अकलूज येथील बहीण व भाचा हे देखील मंगळवारच्या अहवालात कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत.

वैराग येथील किराणा मालाचे होलसेल व्यापारी पुण्यातील खासगी रुग्णालयात कोरोनाबाधित असल्याचे समोर आले.या व्यापाऱ्याच्या आईवर सोलापुरातील नामांकित रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. तत्पूर्वी त्यांनी उपचारासाठी अकलूज व बार्शी येथील रुग्णालयात प्रयत्न केल्याचे समजते. या व्यापाऱ्यांची अकलूज मधील बहीण व भाचा हे कोरोना बाधित आढळले आहेत. अकलूज महिला आपल्या आईला भेटण्यासाठी सोलापुरातील खासगी रुग्णालयात आली होती.

वैरागमधील कोरोना बाधित व्यापारी आपल्या बहिणीला सोडविण्यासाठी अकलूजलाही जाऊन आल्याचे समजते. वैरागमधील व्यापारी कोरोनाबाधित आढळल्यानंतर अकलूजमधील पाच ते सहा जणांना कोरोना चाचणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. आज कोरोनाबाधित आढळलेल्या अकलुजमधील त्या कुटुंबाचा देखील किराणा मालाचा होलसेल व्यवसाय असल्याने माळशिरस तालुक्याच्या ग्रामीण भागात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

मंगळवारी आलेल्या कोरोना चाचणी अहवालात बोरामणी येथील पोलीस कॉन्स्टेबल यांचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. याबाबत

दक्षिण सोलापूरच्या प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी माहिती दिली आहे. ते पाच दिवसांपासून आई-वडिलांसोबत राहत असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना तपासणीसाठी ताब्यात घेण्याचे काम सुरू आहे. लवकरच हा परिसर प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला जाईल.

संपादन - अक्षय शितोळे

First published: May 27, 2020, 10:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या