सोलापुरातील धक्कादायक प्रकार उघड, कोरोना मृत्यूंची आकडेवारी लपवल्याची माहिती समोर

सोलापुरातील धक्कादायक प्रकार उघड, कोरोना मृत्यूंची आकडेवारी लपवल्याची माहिती समोर

सोलापुरात कोरोनामुळे मृत पावलेले 40 जणांचे आकडे लपवण्याचा प्रकार उघड झाला आहे.

  • Share this:

सोलापूर, 22 जून : महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं चित्र आहे. तसंच कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांचं प्रमाणही वाढत आहे. अशातच सोलापूर शहरातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. सोलापुरात कोरोनामुळे मृत पावलेले 40 जणांचे आकडे लपवण्याचा प्रकार उघड झाला आहे.

कोरोना मृत्यूंच्या घोळाबाबत महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनीच माहिती दिली आहे. कम्युनिकेशन गॅपमुळे ही आकडेवारी चुकल्याची मनपा प्रशासनाकडून कबुली देण्यात आली आहे. खासगी आणि शासकीय रुग्णालयतील मृतांची संख्या चुकल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे प्रशासनाची चांगलीच अडचण झाली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांच्या सोलापूर दौऱ्याआधी माहिती उघड झाल्याने याबाबत वेगळी चर्चाही रंगत आहे.

दरम्यान, कोरोनाग्रस्त रूग्णांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या मृत्यूची अन्य कारणे दाखवून त्यांचे पार्थिव परस्पर सोपविले जात असल्याचा आणि मृत्यूचे आकडे कमी दाखविण्याचा प्रयत्न केला जात आहे, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वीच केला होता.

हेही वाचा - कोरोनाचा स्फोट! मुंबईत या कारणामुळे झपाट्यानं वाढतोय व्हायरसचा प्रादुर्भाव!

पुरेशी काळजी घेतली जात नसल्याने कोरोना वाढण्याचा धोका अधिक आहे, असं म्हणत माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिलं होतं.

First published: June 22, 2020, 11:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading