मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

...तर सोलापूरची सीमा ओलांडून देणार नाही, शिवसेनेच्या आमदाराचा भरणेंना इशारा

...तर सोलापूरची सीमा ओलांडून देणार नाही, शिवसेनेच्या आमदाराचा भरणेंना इशारा

शिवबंधनाची ताकद जर पाहायची असेल तर तुम्हाला एका क्षणात दाखवू शकतो. फक्त उद्धव ठाकरे यांचा आदेश हवा

शिवबंधनाची ताकद जर पाहायची असेल तर तुम्हाला एका क्षणात दाखवू शकतो. फक्त उद्धव ठाकरे यांचा आदेश हवा

'शिवबंधनाची ताकद जर पाहायची असेल तर तुम्हाला एका क्षणात दाखवू शकतो. फक्त उद्धव ठाकरे यांचा आदेश हवा'

सोलापूर, 15 ऑगस्ट : सोलापूरचे (solapur) पालकमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रेय भरणे (ncp mla dattatray bharane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अपशब्द वापरल्यामुळे वाद पेटला आहे. त्यानंतर आता शिवसेनेनंही जशाच तसे उत्तर दिले असून 'जर हिंमत बघायची असेल तर सोलापूरची सीमा ओलांडून देणार नाही', असा इशाराच आमदार तानाजी सावंत (Shiv Sena MLA Tanaji Sawant) यांनी दिला आहे. अहो, भरणे मामा आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक आहोत. शिवसेनेचे पक्षप्रमुख हे राज्याचे मुख्यमंत्री आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामुळेच राष्ट्रवादी आज सत्तेत आहे. ज्यांच्या जीवावर तुम्ही सत्तेत बसला आहात, उद्धव ठाकरे यांच्या आशीर्वादामुळे तुम्ही सत्तेत आला आहात, त्यांच्याबद्दल अशी भाषा वापरताय, तुम्ही नीट भाषा वापरा अन्यथा सोलापूरची सीमा अन् उजणी धरण ओलांडून देणार नाही, असा इशाराच तानाजी सावंत यांनी दिला. तसंच, शिवबंधनाची ताकद जर पाहायची असेल तर तुम्हाला एका क्षणात दाखवू शकतो. फक्त उद्धव ठाकरे यांचा आदेश हवा. महाविकास आघाडी सरकार हे तिन्ही पक्षाचे आहे, त्यामुळे सरकारला कोणताही तडा जाईल, असं विधान करायचं नाही. या एका बंधनामुळे आम्ही मान खाली घालून बसलेलो आहोत. त्यामुळे तुम्हीही काही बोलावे, हे सहन केले जाणार नाही, योग्य वेळी योग्य उत्तर दिले जाईल, असा इशाराही सावंत यांनी दिला. काय म्हणाले भरणे? मी खूप समाधानी आहे. जे काही आशीर्वाद असतील ते अजितदादांना द्या. गटनेते, नगरसेवकांनी आयुक्तांनी मला परवानगी दिली आहे. इथं चांगलं गार्डन उभं करायचं आहे. आपल्याला १ कोटी रुपयांचा निधी द्यायचा आहे. तुमच्याकडून मला प्रस्ताव द्या, तितक्यात महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडून निधी आपल्याला घ्यायचा आहे, असं विधान केलं असता. त्यावर भरणे म्हणाले की,  मुख्यमंत्र्यांचे जाऊ द्या, मरू द्या, आपण आपलं करूया ना. मुख्यमंत्र्यांकडून मोठा निधी घ्यायचा आहे' असं वक्तव्य भरणे यांनी भर व्यासपीठावर केल्यामुळे एकच खळबळ उडाली. पण, आपल्या विधानामुळे वाद निर्माण झाला हे लक्षात आल्यावर भरणे यांनी तातडीने दिलगिरीही व्यक्त केली. 'माझ्या विधानाचा विपर्यास केला गेला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमचे नेते आहे. माझं त्यांच्यावर प्रेम आहे, पण काही माध्यमांनी मुद्दामहुन माझ्या वक्तव्याचा चुकीचा विपर्यास केला. माझ्या विधानामुळे कुणाचे मन दुखावले असतील तर मी दिलगिरी व्यक्त करतो, अशा शब्दांत भरणे यांनी भावना व्यक्त केली.
First published:

Tags: NCP

पुढील बातम्या