महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का, सोलापूरच्या महास्वामींची खासदारकी धोक्यात?

महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का, सोलापूरच्या महास्वामींची खासदारकी धोक्यात?

सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ जातपडताळणी प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे.

  • Share this:

सागर सुरवसे, प्रतिनिधी

सोलापूर, 01 फेब्रुवारी : सोलापूरचे भाजपचे खासदार डॉ. जयसिदेश्वर शिवाचार्य महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ जातपडताळणी प्रकरणामुळे चांगलेच अडचणीत सापडले आहे.  बनावट जातीचा पुरावा सादर केल्याचं जातपडताळणी दक्षता समितीच्या अहवालात समोर आलं आहे.

सोलापूरचे भाजपचे खासदार जयसिदेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज भरत असताना बेडा जंगम जातीचा बोगस दाखला सादर  केल्याची तक्रार राजेंद्र मुळे, प्रमोद गायकवाड आणि विनायक कंदकुरे यांनी केली होती. या प्रकरणावर आज सुनावणी झाली.

आज झालेल्या सुनावणीत खासदार महास्वामी यांनी २७ डिसेंबर रोजी झालेल्या सुनावणीत वडिलांच्या नावाने असलेले 'फसल उतारे' पुराव्यासाठी सादर केले होते. महास्वामींनी सादर केलेले उतारे खातरजमा करण्यासाठी दक्षता समितीकडे देण्यात आली होती. दक्षता समितीच्या पाहणीत संबंधित तहसील कार्यालयात रजिस्टरच्या तपासणीत फसल उताऱ्यांची नोंदी सुस्थितीत आणि पाने चिटकावलेल्या स्थितीत आढळले आहेत. तर इत्तर नोंदी अस्पष्टपणे दिसत असल्यामुळे  शेतकऱ्याचा जातीचा स्पष्ट उल्लेख नाही. त्यामुळे या दोन्ही उताऱ्यांबाबत संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे महास्वामींनी दाखल केलेले उताऱ्यांच्या बाबतीत संशय निर्माण झाला आहे.

तर खासदार  महास्वामी यांच्याकडून  १७५ पानी म्हणणे सादर करण्यात आलं आहे. महास्वामी यांच्या तक्रारदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नवार म्हणणे मांडण्यासाठी १५ दिवसांची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे  जात पडताळणी समितीने पुढील तारीख ही १५ फेब्रुवारी दिली आहे. मात्र, यापुढे दोघांनाही आता नव्याने कोणताच पुरावा सादर न करण्याची सूचना केली आहे.

महास्वामींना नोटीस

दरम्यान,  मागील महिन्यात 15 जानेवारीला जयसिद्धेश्‍वर महास्वामी यांना बनावट जात प्रमाणपत्र प्रकरणी नोटीस बजावण्यात आली होती.  महास्वामी यांना ही नोटीस सोलापूर जिल्हा जात पाहाणी आणि पडताळणी समितीद्वारा बजावण्यात आली होती. निवडणूक आयोगाकडे उमेदवारी अर्ज दाखल करताना डॉ.जयसिद्देश्वर महास्वामी यांनी बनावट जात प्रमाणपत्र जोडल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणी रिपाइंचे प्रमोद गायकवाड यांनी आगोदर सोलापूर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे तक्रार आणि त्यानंतर मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली होती.

निवडणुकीतच उमेदवारीवर घेतला होता आक्षेप

विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीत महास्वामी यांच्या उमेदवारीवर अपक्ष उमेदवार प्रमोद गायकवाड यांनी हरकत घेतली होती. मात्र, ही हरकत विचारात न घेता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जयसिद्धेश्वर महास्वामींचा अर्ज वैध ठरवला होता. सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव होता. त्यामुळे बेडा जंगम जातीचा दाखला सादर करत उमेदवार डॉ. जयसिद्धेश्‍वर महास्वामी तथा नुरदय्यास्वामी गुरुबसप्पा हिरेमठ यांनी आपली उमेदवारी दाखल केली. मात्र, जातीच्या दाखल्यावर आक्षेप घेत गायकवाड यांनी हाय कोर्टात धाव घेतली. दरम्यान, आज कोर्टाने महास्वामी यांना 15 दिवसांची मुदत दिली आहे. जर योग्य ती कागदपत्र दाखल केली नाही तर महास्वामींची खासदारकी धोक्यात येऊ शकते.

  कोण आहेत जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी?

डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे लिंगायत समाजात वंदनीय व्यक्तिमत्त्व मानलं जातं. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी हे अक्कलकोट तालुक्यातील गौड इथल्या वीरशैव मठाचे मठाधिपती आहेत. शिवाय बनारस हिंदू विद्यापीठातून त्यांना पीएचडी मिळालेली आहे. महास्वामींना अनेक भाषा येतात. त्यांचं हिंदीवर प्रभुत्व आहे. शिवाय काही कन्नड आणि तेलुगू भाषिकही त्यांचे भक्त आहेत. दर गुरुवारी ते मौनव्रत करत असत, असं त्यांचे अनुयायी सांगतात. विद्यमान खासदार शरद बनसोडे यांना डावलून सिद्धेश्वर शिवाचार्य यांना भाजपने उमेदवारी दिली होती.

First published: February 1, 2020, 7:21 PM IST

ताज्या बातम्या