सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, मोठ्या भावानं संपवलं लहान भावाचं कुटुंब

सख्खा भाऊ झाला पक्का वैरी, मोठ्या भावानं संपवलं लहान भावाचं कुटुंब

रामचंद्र देवकते या सख्ख्या मोठ्या भावाने आपला छोटा भाऊ राहुल याच्यासह आई, भावाची बायको सुषमा आणि मुलगा आर्यन याच्या अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ टाकून जाळून दिल्याची घटना घडलीय.

  • Share this:

बार्शी, 29 जून : नात्याला काळीमा फासणारी घटना सोलापुरातील बार्शी तालुक्यातल्या खांडवी गावात घडलीय. सख्ख्या मोठ्या भावानंच लहान भावाचं संपूर्ण कुटुंब संपवलंय. रामचंद्र देवकते या सख्ख्या मोठ्या भावाने आपला छोटा भाऊ राहुल याच्यासह आई, भावाची बायको सुषमा आणि मुलगा आर्यन याच्या अंगावर पेट्रोलजन्य पदार्थ टाकून जाळून दिल्याची घटना घडलीय.

हेही वाचा

विधानपरिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात अखेर भाजपचाच झेंडा

भाजपविरोधी सर्व मोठ्या राजकीय पक्षांना पॅरेलिसीस झालाय - प्रकाश आंबेडकर

VIDEO : मुलं चोरण्याच्या संशयावरून पंढरपूरच्या माजी नगरसेवकांसह सहकाऱ्यांना बेदम मारहाण

यामध्ये राहुल यांची बायको सुषमा आणि आर्यन हे भाजून जागीच मयत झालेत. तर राहुल आणि त्याची आई आणि आरोपी रामचंद्र देवकते हे तिघेही गंभीर जखमी आहेत. उस्मानाबाद येथील सिव्हिल हाॅस्पिटल येथे उपचारासाठी तिघांना दाखल केले असून यामध्ये राहुल याचे भाजण्याचे प्रमाण जास्त आहे. आरोपी रामचंद्र देवकाते याने त्याची पत्नी आणि दोन मुलांना दुसऱ्या खोलीत बंद करून बाहेरून कडी लावल्यामुळे ते सुखरूप आहेत.

जमिनीच्या वादातून हा सर्व प्रकार घडला असल्याचे सांगितले जातेय. पुढील तपास पोलीस करीत आहेत. मात्र या घटनेमुळे खांडवी गावात शोक व्यक्त केला जातोय...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 29, 2018 11:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading