मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा अखेर पोलिसांच्या ताब्यात

MLA Gopichand Padalkar:  भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे (BJP MLA) आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं वृत्त बुधवारी समोर आलं होतं.

  • Published by:  Pooja Vichare

सोलापूर, 03 जुलै: भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे (BJP MLA) आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या गाडीवर दगडफेक झाल्याचं वृत्त बुधवारी समोर आलं होतं. दरम्यान आता गाडीवर दगडफेक फेकणाऱ्याच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा अमित सुरवसे याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अमित सुरवसे याला सोलापुरातील दहिटणे परिसरातून गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

सोलापुरातील मड्डी वस्ती परिसरात आमदार पडळकर यांच्या गाडीवर 30 जून रोजी हल्ला झाला होता. हल्ल्यानंतर अमित सुरवसे फरार झाला होता. अखेर आज दोन दिवसांनंतर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेनं त्याला ताब्यात घेतलं आहे.

काय घडलं होतं?

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञाताने दगड भिरकावला होता. (Attack on BJP MLA Gopichand Padalkar). या हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची काच फुटली आहे. या घटनेचा व्हिडिओ ही (Video of Stone Pelting on BJP MLA Gopichand Padalkar's Car) आता समोर आला होता. या व्हिडिओमध्ये एक तरुण पडळकरांच्या गाडीवर मोठा दगड फेकताना दिसून आला.

गाडीची काच फोडल्यानंतर या व्यक्तीनं त्याठिकाणाहून पळ काढला. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली. सोलापूरमध्ये गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर अज्ञातांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या विरोधात घोषणाबाजीही केली होती.

First published:

Tags: Gopichand padalkar, Solapur