सोलापूरात श्रीमंत कसबा गणपतीला 100 डझन आंब्यांची आरास, पूजेनंतर आंब्यांचे गरिबांना करणार वापट

सोलापूरात श्रीमंत कसबा गणपतीला 100 डझन आंब्यांची आरास, पूजेनंतर आंब्यांचे गरिबांना करणार वापट

Kasba Ganpati: सोलापुरातील कसबा गणपतीला आंब्यांची आरास करण्यात आली आहे.

  • Share this:

सोलापूर, 12 मे: सोलापूरमधील श्रीमंत मानाचा कसबा गणपतीच्या (Solapur Kasba Ganpati) चरणी अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर (Akshya Tritiya) 100 डझन हापूस आंब्यांची आरास करण्यात आलीय. श्रींच्या विधिवत पूजेनंतर हे आंबे मंदिर समितीकडून गोररगरिबांमध्ये महाप्रसादाच्या रूपात वाटण्यात येणार आहेत. बाप्पांच्या भोवताली आंब्यांची आरास (Mango decoration) केल्यामुळे बाप्पांची मूर्ती अधिक खुलून दिसत आहे.

दरम्यान,'जगावरती आलेलं कोरोनाचं विघ्न दूर हटून सर्व जनजीवन पूर्ववत होऊ दे' अशी प्रार्थना यावेळी मंडळाच्या सदस्यांकडून करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेचे औचित्य साधून हा आरास करण्यात आला आहे.

वाचा: सोन्याच्या जेजुरीचा आज रंगच न्यारा! खंडेरायाच्या गडावर अशी झाली रंगपंचमी!

सोलापूर जिल्ह्यात प्रथमच आंबा महोत्सव होणार आहे. गणरायाच्या चरणी आरास करण्यात आलेल्या या आंब्यांचे वाटप गोरगरिबांना करण्यात येणार आहे. बाप्पाची पूजा झाल्यावर या 100 डझन आंब्यांचे गरिबांना मोफत वाटप करण्यात येणार आहे.

पंढरपुरातही श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने प्रत्येक सण-उत्सवाला मंदिराच्या गाभाऱ्यात मनमोहक अशी फुलांची आरास करण्यात येत असते. त्याचप्रमाणे यंदा अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर सोलापूर येथील कसबा गणपीतीला आंब्यांची आरास करण्यात आली आहे.

Published by: Sunil Desale
First published: May 12, 2021, 11:32 PM IST
Tags: solapur

ताज्या बातम्या